ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके विजयी
![Rituja Latke of Thackeray group won](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Rutuja-Latake-768x470.png)
मुंबई । महाईन्यूज ।
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पार पडलेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ऋतुजा लटके या मोठ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत त्यांना ४२७७ मते तर दुसऱ्या फेरीत ७८१७ मते मिळाली आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली मनपा शाळेमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. या मतमोजणीसाठी २०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये मुंबई उपनगर जिल्हा प्रशासन, राज्य शासनाची विविध खाती, बृहन्मुंबई महानगरपालिका, म्हाडा, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई मेट्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यासारख्या विविध संस्थांच्या अखत्यारीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
ऋतुजा लटके – शिवसेना : 55946,
बाला नाडार – आपकी अपनी पार्टी (पिपल्स): 1286,
मनोजकुमार नायक – राईट टू रिकाॅल पार्टी : 785,
निना खेडेकर – अपक्ष : 1276,
फरहान सय्यद – अपक्ष : 932,
मिलिंद कांबळे – अपक्ष : 546,
राजेश त्रिपाठी – अपक्ष :1330,
नोटा – : 10906,
टोटल: 73006