breaking-newsTOP Newsक्रिडाताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

ऋषभ पंतने प्राण वाचवणाऱ्या दोघांचे मानले आभार; म्हणाला, मी सदैव ऋणी राहीन

ऋषभ पंतने दिली तीन शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती

मुंबई : भारतीय संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा मागच्या महिन्यात भीषण अपघात झाला. रूकडी येथे जात असताना त्याची कार डिवायडरला धडकली. त्यानंतर कारने पेट घेतला. या भीषण अपघातातून ऋषभ पंत सुदैवाने बचावला. या अपघातात ऋषभच्या हाताला, पायाला, कमरेला आणि डोक्याला मार लागला. त्याच्यावर सध्या मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पंतने आपल्या हेल्थची अपडेट देत फॅन्स आणि हितचिंतकांचे आभार मानले आहेत. सोबतच अपघातावेळी त्याचे प्राण वाचवणाऱ्या दोघांचा आवर्जुन उल्लेख करत आभार मानले आहेत.

ऋषभ पंतने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दोन मुलांचे त्यांच्या नावसह फोटो शेअर केले आहेत. “मी व्यक्तिगत प्रत्येकाचे आभार मानू शकत नाही. पण या दोन हिरोंना कधी विसरणार नाही. अपघातानंतर त्यांनी माझी मदत केली. मी व्यवस्थित हॉस्पिटलमध्ये कसा पोहोचीन? हे त्यांनी सुनिश्चित केलं. रजत कुमार आणि निशु कुमार तुम्हा दोघांचे भरपूर आभार, मी नेहमीच तुमचा आभारी आणि ऋणी राहीन”, असं पंतने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सध्या ऋषभ पंतवर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रूग्णालयात तीन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. दोन गुडघ्यावर आणि एक घोट्यावर. या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती ऋषभने सोशल मीडियाद्वारे दिली आहे. तो एक वर्षासाठी संघाबाहेर असण्याची शक्यता आहे. मुंबईत आल्यानंतर, बीसीसीआयच्या पॅनेलमधील एक सर्जन डॉ. दिनशॉ परडीवाला यांच्या देखरेखीखाली त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button