breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र

पाचगणी व महाबळेश्वरमध्ये पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना परत पाठवले

  • सेवा देणाऱ्या हॉटेलवर कारवाई

वाई |

साताऱ्यात प्रशासनाने निर्बंध शिथिल केल्याचा फायदा उचलत शनिवार-रविवारी महाबळेश्वर पाचगणी परिसरात पर्यटकांनी मोठी प्रमाणात गर्दी केली. दरम्यान जिल्हाबंदी उठली असली तरी महाबळेश्वर पाचगणी पर्यटनस्थळावर अद्याप कडक निर्बंध लागू असल्याने पर्यटकांना परत फिरावे लागले. दरम्यान या र्निबधामध्येही ज्यांनी हॉटेल किंवा लॉज उघडत पर्यटकांची गर्दी जमवली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. करोना संसर्ग उतरणीस लागल्यामुळे साताऱ्यात प्रशासनाने नुकतेच जिल्ह्य़ातील निर्बंध मोठय़ा प्रमाणात शिथिल केले.

याअंतर्गत जिल्ह्य़ात प्रवेशासाठी लागणारे परवानगीची अटही रद्द करण्यात आली. या पार्श्वभूमीवर शनिवार—रविवार सुट्टीचा योग साधत पुण्या—मंबईतील शेकडो पर्यटकांनी पाचगणी—महाबळेश्वरची वाट पकडली होती. मात्र निर्बंध शिथिल केले असले तरी सातारा जिल्ह्य़ाच्या ग्राणीण भागात अद्यापही शनिवार—रविवारी कडक निर्बंध लागू असल्याने पाचगणी—महाबळेश्वर पर्यटन स्थळही बंद होते. यामुळे सुट्टीचा योग साधत येथे पर्यटकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली मात्र येथील सर्वच व्यवस्था बंद असल्याने त्यांना परत फिरावे लागले. दरम्यान या र्निबधामध्येही ज्यांनी हॉटेल किंवा लॉज उघडत पर्यटकांची गर्दी जमवली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button