पिंपरी-चिंचवड पोलीस भरती परीक्षेचा आरक्षणनिहाय निकाल जाहीर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/12/pcpc-logo.jpg)
पिंपरी l प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड पोलीस शिपाई भरतीची लेखी परीक्षा 19 नोव्हेंबर रोजी झाली. या परीक्षेचा सामाजिक व समांतर आरक्षण निहाय निकाल जाहीर झाला आहे.
पोलीस भरती निवड समितीने उमेदवारांनी आवेदन अर्जात भरलेल्या माहितीनुसार सामाजिक आरक्षण व समांतर आरक्षणानुसार कट ऑफ यादी जाहीर केली आहे. एकास दहा या प्रमाणात ही कट ऑफ यादी जाहीर करण्यात आली आहे. 11 हजार 534 उमेदवारांची यामध्ये निवड करण्यात आली आहे. हे उमेदवार कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करिता पात्र ठरले आहेत. कागदपत्र पडताळणी, शारीरिक मोजमाप आणि मैदानी चाचणीसाठी स्वतंत्ररित्या पिंपरी चिंचवड पोलिसांच्या संकेतस्थळावर सूचना देण्यात येणार आहे.
असा लागला निकाल –
खुला गट
सर्वसाधारण (85), महिला (79), खेळाडू (82), प्रकल्पग्रस्त (85), भूकंपग्रस्त (81), माजी सैनिक (69), अंशकालीन पदवीधर (35), पोलीस पाल्य (78), गृहरक्षक दल (78)
ई डब्ल्यू एस (आर्थिकदृट्या मागास)
सर्वसाधारण (81), महिला (63), खेळाडू (74), प्रकल्पग्रस्त (81), भूकंपग्रस्त (78), माजी सैनिक (36), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (63), गृहरक्षक दल (62)
इतर मागास प्रवर्ग
सर्वसाधारण (79), महिला (67), खेळाडू (70), प्रकल्पग्रस्त (77), भूकंपग्रस्त (62), माजी सैनिक (42), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (65), गृहरक्षक दल (59)
विशेष मागास प्रवर्ग
सर्वसाधारण (77), महिला (64), खेळाडू (46), प्रकल्पग्रस्त (65), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (38), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (-), गृहरक्षक दल (41)
भटक्या जमाती – ड
सर्वसाधारण (81), महिला (67), खेळाडू (64), प्रकल्पग्रस्त (82), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (53), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (-), गृहरक्षक दल (60)
भटक्या जमाती – क
सर्वसाधारण (81), महिला (69), खेळाडू (61), प्रकल्पग्रस्त (81), भूकंपग्रस्त (65), माजी सैनिक (51), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (62), गृहरक्षक दल (64)
भटक्या जमाती – ब
सर्वसाधारण (81), महिला (72), खेळाडू (69), प्रकल्पग्रस्त (74), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (33), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (69), गृहरक्षक दल (69)
विमुक्त जाती – अ
सर्वसाधारण (81), महिला (69), खेळाडू (68), प्रकल्पग्रस्त (79), भूकंपग्रस्त (-), माजी सैनिक (37), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (67), गृहरक्षक दल (67)
अनुसूचित जमाती
सर्वसाधारण (71), महिला (55), खेळाडू (41), प्रकल्पग्रस्त (62), भूकंपग्रस्त (42), माजी सैनिक (48), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (42), गृहरक्षक दल (41)
अनुसूचित जाती
सर्वसाधारण (77), महिला (67), खेळाडू (60), प्रकल्पग्रस्त (73), भूकंपग्रस्त (68), माजी सैनिक (33), अंशकालीन पदवीधर (-), पोलीस पाल्य (66), गृहरक्षक दल (59)