पाटी-पुस्तकमहाराष्ट्रमुंबई

अकरावी प्रवेशासाठी 24 मे पासून नोंदणी!

मुंबईतील 2385 महाविद्यालयांमध्ये 3 लाख 89 हजार 675 जागा उपलब्ध

मुंबई : अकरावी प्रवेशासाठी 24 मेपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे. यंदा दोन विशेष फेऱ्या घेतल्या जाणार आहेत. त्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्याही घेतल्या जाणार आहेत. मात्र FCFS ही फेरी होणार नाही. तसेच, प्रत्येक फेरीसोबत विविध कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू राहणार आहेत. त्यासोबतच ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी सराव करता यावा यासाठी 22 आणि 23 मे हे दोन दिवस देण्यात आले आहेत.

अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा तीन नियमित फेऱ्या, दोन विशेष फेऱ्या होणार आहेत. त्यानंतरही जर काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही तर मात्र, विशेष आणि दैनिक गुणवत्ता फेऱ्या होतील. यंदा FCFS ही फेरी होणार नाही. प्रत्येक फेरीसोबत विविध कोट्यांतर्गत प्रवेश प्रक्रिया समांतर सुरू राहील.

22 मेपासून ऑनलाईन सराव प्रवेश
अकरावी प्रवेश प्रक्रियेचा सराव करता यावा म्हणून 22 आणि 23 मे असे दोन दिवस ठरवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना https://11thadmis- sion.org.in/ या पोर्टलवर डमी लॉगिन आणि यासाठीच्या सुविधा दिल्या जातील. पण, प्रत्यक्ष अर्जाचा पहिला भाग भरण्याची प्रक्रिया 24 मेपासून सुरू होणार आहे. दहावीच्या निकालानंतर दुसरा भाग भरण्याची प्रक्रिया सुरू होईल.

अकरावीचे प्रवेश केंद्रीय प्रवेश फेऱ्यांच्या माध्यमातून केले जातील. व्यवस्थापन, अल्पसंख्याक आणि इनहाऊस कोट्यातील प्रवेश महाविद्यालयांमध्ये केले जाणार आहेत. कोट्यातील जागा रिक्त राहिल्यास त्या केंद्रीय प्रवेशात समाविष्ट केल्या जातील. कोट्यातील प्रवेशही गुणवत्तेनुसार देण्यात येतील.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button