लालपरीचा प्रवास महागला! रिक्षा-टॅक्सीचीही भाडेवाढ; जाणून घ्या नवे दर

ST Bus Ticket Rate Hike | राज्यभरातील प्रवाशांसाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेससह खासगी वाहनांचा प्रवास महागणार आहे. विधानसभा निवडणुकांच्या आधीपासून प्रलंबित असलेल्या एसटी प्रवासाच्या भाडेवाडीला मंजूरी देण्यात आली आहे. एसटीच्या तिकीटात १४.९५ टक्के दरवाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्रासह मुंबईमधील प्रवाशांसाठी हे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. हे नवे दर कधीपासून लागू होणार याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नव्हती, मात्र आता हे नवे दर आजपासूनच लागू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त महापालिका कर्मचाऱ्यांना शपथ
दुसरीकडे राज्य परिवहन खात्याने एसटी दरवाढ केल्यानंतर मुंबईतील टॅक्सी आणि रिक्षा भाडेवाढही होणार आहे. टॅक्सी आणि रिक्षामध्ये तीन रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे. टॅक्सी सध्याचे दर हे २८ रुपये आहेत तर आता नव्या दरवाढीनुसार ते ३१ रुपये होतील.





