MPSC कडून ‘या’ पदांसाठी भरती; असा कराल अर्ज
![MPSC कडून ‘या’ पदांसाठी भरती; असा कराल अर्ज](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/logompsc.jpg)
मुंबई |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून लवकरच काही पदांची भरती केली जाणार आहे. विमा अधिकारी पदांच्या काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी एमपीएससीने अधिसूचना जारी केली आहे. विमा सहायक संचालक, विमा उप संचालक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी या पदांसाठी भरती आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करता येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ डिसेंबर २०२१ आहे. परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गसाठी ७१९ रुपये, तर मागास प्रवर्गासाठी ४४९ रुपये आहे. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.
- विमा सहायक संचालक
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कला, वाणिज्य, विज्ञान आणि कायद्याचं पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे.
- विमा उप संचालक
या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कला, वाणिज्य, विज्ञान आणि कायद्याचं पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी आवश्यक आहे.
- जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी
या पदासाठी अर्ज करण्यासाठी सैन्यात मेजर किंवा नौदल, हवाई दलात काम केलं असणं आवश्यक आहे. सेवानिवृत्त अधिकारीही अर्ज करू शकतात.
- आवश्यक कागदपत्र
बायोडेटा, दहावी-बारावी आणि पदवीचं शैक्षणिक प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, ओळखपत्र, पासपोर्ट साइज फोटो आवश्यक आहे.