breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्र
जतमध्ये राष्ट्रवादीला धक्का; पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय
![Congress announces third list for Goa Assembly elections](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Congress-New-1.jpg)
जत | प्रतिनिधी
जत नगरपालिकेच्या प्रभाग ५ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादी आणि भाजपा पुरस्कृत उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला. काँग्रेसचे उमेदवार गजानन उर्फ राजू यादव या निवडणुकीत ६३ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादी आणि भाजपाला हा मोठा धक्का मानला जातो.
जत नगरपालिकेच्या प्रभाग ५ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात काँग्रेसचे राजू यादव आणि राष्ट्रवादी-भाजपा पुरस्कृत इम्रान गवंडी यांच्यात लढत झाली. या चुरशीच्या लढतीत यादव ६३ मतांनी विजयी झाले. राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांचे ३५ वर्षांपासून या नगरपालिकेवर वर्चस्व आहे. त्यांचा बालेकिल्ला म्हणून हा भाग ओळखला जातो. असे असताना तिथे माजी नगराध्यक्ष गवंडी यांचे पुत्र इम्रान गवंडी यांचा पराभव झाल्याने राष्ट्रवादी आणि भाजपासाठी तो मोठा धक्का मानला जातो