breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

पुणेकरांना दिलासा, महापालिकेकडून सवलतीत मिळकतकर भरण्यासाठी मुदतवाढ

पुणे | ५ ते १० टक्के सवलतीत मिळकतकर भरण्यासाठी अवघा एकच दिवस बाकी असताना पुणेकरांनी एका दिवसात ७३ कोटी रुपयांचा मिळकत कर भरला आहे, करदात्यांचा प्रतिसाद पाहता पुणे महापालिकेने (PMC) ३१ मे पर्यंतची सवलतीत कर भरण्याची मुदत १५ दिवसांनी वाढवून १५ जून पर्यंत केली आहे, त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे.

पुणे महापालिकेच्या (PMC) मिळकतकर विभागाचे १५ क्षेत्रीय कार्यालय, ५६ संपर्क कार्यालय अशी एकूण ७१ कार्यालये आहेत. याप्रत्येक ठिकाणी पुणेकरांना कर भरता येतो. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मिळकत करातून जास्त पैसे मिळावेत यासाठी १ एप्रिल ते ३१ मे या दोन महिन्याच्या कालावधीत २५ हजारापर्यंत १० टक्के व २५ हजाराच्या पुढे ५ टक्के सवलत दिली जाते. ही योजना पुणेकरांमध्ये लोकप्रिय असल्याने दरवर्षी यास भरपूर प्रतिसाद मिळतो. मिळकतकराची सवलत ३१ मे रोजी संपणार असल्याने पुणेकरांची कर भरणा करण्यासाठी लगबग सुरु आहे. त्याचे प्रत्यंतर आज पुन्हा एकदा दिसून आले. गुरुवारी (दि.३०) एका दिवसात ७३ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण ५ लाख ६५ हजार मिळकतकर धारकांनी ९७३ कोटींचा कर महापालिकेकडे जमा केला आहे.

हेही वाचा    –    ‘विधानसभेच्या २५ जागांची संभाजी ब्रिगेडची मागणी’; ॲड. मनोज आखरे 

मात्र अनेक नागरिकांना मिळकतकराची बिलेच मिळालेली नसल्याने पैसे भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.महापालिका प्रशासनाने या तक्रारींची दखल घेत १५ दिवसांची मुदतवाढ दिलेली आहे. तसेच नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही मिळकतकर भरता यावा यासाठी महानगरपालिकेचे सर्व नागरी सुविधा केंद्र शनिवार व रविवार तसेच सार्वजनिक शासकीय सुट्टीच्या दिवशी देखील सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत सुरु राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मिळकतकर भरावा असे आवाहन कर संकलन विभागाचे प्रमुख, उपायुक्त माधव जगताप यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button