breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपुणेमहाराष्ट्रमुंबई

पुणे : बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे गुणवंत मुलांचा सत्कार

पुणे । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणेसेंटरच्या वतीने बांधकाम कामगारांच्या १०० गुणवंत मुला मुलींचा सत्कार संपन्न झाला. प्रमाणपत्र व स्मार्ट वॉच असे सत्काराचे स्वरूप होते. इंस्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अतिरिक्त कामगार आयुक्त, पुणे अभय गीते, डोअर स्टेप स्कूलच्या रजनी परांजपे, बिल्डर्स असोसिएशन, पुणेचे अध्यक्ष हरप्रीतसिंग आनंद, माजी अध्यक्ष आर. बी. सूर्यवंशी, प्रकल्प समन्वयक दिलीप शिरोळे, अखिल भारतीय बिल्डर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष भगवान देवकर आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रस्तविक भाषणात दिलीप शिरोळे यांनी संस्थेची माहिती दिली. या प्रसंगी बोलतांना अभय गीते यांनी अशा कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल,तसेच त्यांनी सरकारच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे संगितले. रजनी परांजपे यांनी बोलतांना बांधकाम मजुरांचे पालक अनेक अडचणी सोसून विद्यार्थांना शिक्षण देत आहेत याचे कौतुक केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button