ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये गौतमी पाटील हिचा कार्यक्रम, कार्यक्रमास तुफान गर्दी

गौतमी पाटील हिने चाहत्यांना नाराज न करता पावसात आपली अदाकारी सादर केली

महाराष्ट्र : प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने तरुणाईवर चांगली मोहिनी घातली आहे. सबसे कातिल गौतमी पाटील म्हणून तिने ख्याती मिळवलेली आहे. गौतमी पाटील हिचा कार्यक्रम कुठेही असला तरी तुफान गर्दी असते. तिच्या कार्यक्रमात अनेकदा गर्दीमुळे गोंधळ झाला आहे. काही वेळा तिचे कार्यक्रम रद्द करण्याचा प्रसंग आयोजकांवर आला. गौतमी पाटील संदर्भात तरुणाईमध्ये असलेल्या क्रेझमुळे मोठ्या शहरांमध्येच नव्हे तर लहान-लहान गावांमध्ये तिच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. आता पुणे जिल्ह्यातील शिरुरमध्ये गौतमी पाटील हिचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास तुफान गर्दी झाली. त्याचवेळी पाऊस सुरु झाला. परंतु चाहत्यांना नाराज न करता गौतमी पाटील हिने पावसात आपली अदाकारी सादर केली.

पावसाच्या सरी अन् गौतमीचे नृत्य
शिरूर तालुक्यातील वढू बुद्रुक येथे शिवछावा प्रतिष्ठानकडून दहीहंडी उत्सवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम सुरु असताना पाऊस सुरु झाला. मोकळ्या मैदानावर असलेल्या या कार्यक्रमात पावसात भिजत गौतमीची चाहतेही थांबून राहिले. मग गौतमी पाटील हिनेसुद्धा कार्यक्रम थांबवला नाही. ती सुद्धा भर पावसात थिरकली. आपल्या आगळ्या वेगळ्या अंदाजाने चाहत्यांचे मनोरंजन केले. पावसाच्या जोरदार सरी कोसळत असताना गौतमी पाटील हिच्या अदाकारींवरती बेधंद होऊन प्रेक्षकही नाचू लागते. अनेक दिवसानंतर गौतमी पाटील अदा प्रेक्षकांना पाहायला मिळाली.

गौतमीला त्या गुन्ह्यात जामीन
नृत्यांगना गौतमी पाटील अहमदनगरच्या जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. गेल्या वर्षी गणपती विसर्जनाच्या दिवशी अहमदनगरमधील पाईपलाईन रोडवर तिचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाची परवानगी आयोजकांनी घेतली नाही. त्यामुळे विनापरवानगी कार्यक्रम घेत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या संदर्भात पोलिसांच्या फिर्यादीवरून गौतमी पाटील व इतरांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात न्यायालयाने अटी आणि शर्तीनुसार गौतमी पाटील हिला जामीन मंजूर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button