सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून प्राचार्य डॉ. मनोहर पाटील सन्मानित
व्यवसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) म्हणून कुलगुरू, प्रकुलगुरू यांच्या हस्ते सन्मानित
![Principal from Savitribai Phule Pune University Dr. Manohar Patil honored](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/02/PRACHARYA-1-780x470.jpg)
पुणेः मराठवाडा मित्र मंडळ औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, थेरगाव, पुणे येथील प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त ‘उत्कृष्ट प्राचार्य’ व्यवसायिक अभ्यासक्रम (शहरी विभाग) म्हणून कुलगुरू, प्रकुलगुरू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
डॉ. मनोहर पाटील हे उत्कृष्ट प्रशासक, संशोधक व शिक्षक म्हणून गेली ३३ वर्षे कार्यरत असून, डॉ. मनोहर पाटील यांना आतापर्यंत रू. ५० लाख संशोधन निधी तसेच रू. १ कोटीपर्यंत संस्था विकास निधी विद्यापीठ, राज्य व केंद्र सरकारच्या उपक्रमामधून उपलब्ध झाला आहे. त्यांचे आतापर्यंत १२५ शोधनिबंध विविध राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत १४ पेटंट फाईल केले असून, ८ ग्रॅन्ट झाले आहेत. त्यांनी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर सुध्दा काम केले आहे.
मराठवाडा मित्र मंडळाच्या औषधनिमार्णशास्त्र महाविद्यालयात डी. फार्मसी, वी. फार्मसी, एम. फार्मसी व पीएच. डी. आदी अभ्यासक्रम चालविले जातात. महाविद्यालयास आतापर्यंत रू. ३२७.२८ लाख संशोधन, विकास व इतर निधी विद्यापीठ राज्य व केंद्र सरकारच्या विविध उपक्रमांमधून प्राप्त झाला आहे. महाविद्यालय एनआयआरएफ क्रमवारीमध्ये पहिल्या शंभरमध्ये असून, नॅक ‘अ प्लस’ दर्जा प्राप्त आहे. महाविद्यालयास फार्मा अन्वेशन २०२३, वेस्ट इंडस्ट्री लिंन्कड महाविद्यालय तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ‘उत्कृष्ट महाविद्यालय’ पुरस्कार प्राप्त झाला आहे.