breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात आजपासून पूर्वमोसमी पावसाला होणार सुरुवात; जाणून घ्या आजचे हवामान अपडेट

Maharashtra Weather | जून महिन्याची सुरुवात झाल्या क्षणापासून पावसाचं आगमन कधी होणार याचीच उत्सुकता अनेकांना लागून राहिल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये उकाडा कमी होण्याचं नाव घेत नसल्यामुळ आता सूर्याचा प्रकोप असह्य होताना दिसत आहे.

पुढील २४ तासांच्या हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा     –    Pimpri-Chinchwad | काळेवाडीत निवासी परिसरातील २ कारखान्याला भीषण आग 

राज्यात सध्या मान्सूनचं आगमन झालं नसलं तरीही मान्यूनच्या आगमनासाठीचं पोषक वातावरण मात्र तयार होताना दिसत आहे. ज्यामुळं कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या पूर्व भागात सोमवारी (३ जून २०२४) रोजी वादळी पावसाची हजेरी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या भागांमध्ये पावसाचा यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ४ जून पर्यंत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय. हवामान विभागाकडून पुढील २ दिवस सिंधुदुर्गात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button