ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पीओपीच्या मूर्तींवर बंदी अंमलात येऊ शकलेली नाही

न्यायमूर्ती उपाध्याय यांची पीओपी मूर्तींच्या वापराबाबतच्या नियमावलीचं पालन होत नसल्याबाबत नाराजी

महाराष्ट्र : महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने पीओपीच्या गणेश मूर्तींना विरोध केला जात आहे. पर्यावरणप्रेमी व पर्यावरण तज्ज्ञ यासंदर्भात सातत्याने भूमिका मांडताना दिसतात. पीओपीच्या मूर्तींच्या उत्पादनावरच बंदी घालण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरू लागली आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या आधी त्यावर मोठी चर्चाही होते. मात्र, अद्याप पीओपीच्या मूर्तींवर बंदी अंमलात येऊ शकलेली नाही. यासंदर्भात आज उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने अशा मूर्तींचा वापर टाळण्याचं आवाहन केलं असून तशा मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश सरकारला दिले आहेत.

“आम्हाला याची कल्पना आहे की अनेक मंडळांना यासंदर्भात आधीच परवानगी देण्यात आलेली आहे. आता प्रशासनानं संबंधित मंडळांना पीओपीच्या मूर्ती न वापरण्याचं आवाहन करावं. पीओपी मूर्तींवरील बंदीबाबतच्या नियमावलींबाबत सविस्तर प्रक्रियेनुसार निर्णय घेतला जाईल. या मुद्द्याशी संबंधित सर्वांनी यासंदर्भात ३१ ऑक्टोबरपर्यंत प्रतिज्ञापत्रे सादर करावीत”, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय यांनी दिले आहेत.

नियमावलीचं पालन होत नसल्याबाबत नाराजी
दरम्यान, न्यायमूर्ती उपाध्याय यांनी पीओपी मूर्तींच्या वापराबाबतच्या नियमावलींचं पालन केलं जात नसल्यावर नाराजी व्यक्त केली. “आमच्यासाठी हा मुद्दा फार विचलित करणारा आहे. पर्यावरणाच्या दृष्टीनेही व प्रशासनाच्या दृष्टीनेही. २०२०मध्ये यासंदर्भातली नियमावली जारी करण्यात आली आहे. मात्र, त्याचं अद्याप ठोस स्वरुपात पालन केलं जात नाही”, असं न्यायमूर्ती म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button