breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

PMC Bank Fraud: खातेदारांची ‘मातोश्री’बाहेर फलकबाजी

मुंबई | महाईन्यूज

पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेचा घोटाळा समोर आल्यानंतर तत्काळ कारवाई करून या बँकेतील संचालक आणि अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र आर्थिक अनियमिततेमुळे सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझव्‍‌र्ह बँकेने लादलेल्या र्निबधांना दीड वर्ष लोटल्यानंतर अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाहीये. त्यामुळे बँकेच्या खातेदारांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. खातेदारांनी रविवारी रात्री थेट शिवसेना भवन, मातोश्री, मंत्रालय, शिवालय, चर्चगेट, सिटी बँक मुख्यालयाबाहेर बँकेचे अध्यक्ष आणि संचालकांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे फलक झळकवून रोष व्यक्त केलेला आहे.

सुमारे दीड वर्षांपूर्वी सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर रिझव्‍‌र्ह बँकेने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे बँकेचे व्यवहार ठप्प झालेले आहेत. या प्रकारामुळे बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांमध्ये असंतोष धगधगू लागलेला आहे. बँकेचे संचालक आणि अन्य अधिकाऱ्यांकडे चौकशी केल्यानंतर बँकेबाबत कोणतीच माहिती मिळत नाहीये. केवळ विलीनीकरण होणार असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र या बँकेचे अन्य बँकेत विलीनीकरण होण्याचे चिन्हे दिसत नाही. त्यामुळे अखेर बँकेच्या काही खातेदारांनी मंत्रालय, मातोश्री, शिवसेना भवन, शिवालय, चर्चगेट, सिटी बँक मुख्यालयाच्या आसपास रविवारी निषेधाचे फलक झळकवून रोष व्यक्त केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button