पेट्रोल चोरांचा थेट पाईपलाईनवर डल्ला; पेट्रोलनं दोन विहिरी भरल्यानं महाराष्ट्रात खळबळ
![Petrol thieves hit the pipeline directly; Excitement in Maharashtra as petrol fills two wells](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Petrol-Chori.jpg)
सातारा – चोर कुठे दरोडा टाकतील आणि काय चोरी करतील याचा काही नेम नाही. पैसे, मौल्यवान दागिने, महाग वस्तू अश्या प्रकारच्या चोरीच्या घटना साधारण घडत असतात. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठया प्रमाणात वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्यांना याचा फटका बसत आहे. महाग होणाऱ्या इंधनाकडेच चोरांनी मोर्चा वळवला आहे.
सातारा जिल्ह्यातील एका गावात चोरीचा एक अनोखा प्रकार उघडकीस आला आहे. या वेळेस अटखोर चोरांनी पेट्रोल चोरी करण्यासाठी चक्क पेट्रोल वाहून नेणारी पाईपलाईन फोडली आहे. या घटनेचे विशेष म्हणजे, चोरट्यांनी पेट्रोल पाईपलाईन तशीच सोडून दिल्यामुळे परिसरात पेट्रोलच्या दोन विहिरीच भरल्या आहेत. हिंदुस्थान पेट्रोलियमच्या मुंबई-पुणे-सोलापूर या 223 किलोमीटर पाईपलाईनवर साताऱ्यातील सासवड गावाजवळ चोरट्यांनी दरोडा घातला आहे.
चोरट्यांनी लाखो रुपयांचे पेट्रोल चोरुन तिथून काढता पाय घेतला आहे. पेट्रोलची पाईपलाईन तशीच सोडल्याने त्या परीसरात मोठ्या प्रमाणात पेट्रोलचा जमिनीत निचरा झाला असून, शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाल्याने बघणाऱ्यांची गर्दी होत आहे. गावात कोणताही चुकीचा प्रकार घडायला नको, याकरता पोलीस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अग्निशमन दलाच्या गाड्याही परिसरात हजर आहे.
https://www.facebook.com/keshav.alkari/videos/2325761477567376/?t=42