breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आता थेट तुमच्या गावातून एसटी बस पंढरपूरला जाणार; मात्र ही अट लागू

Pandharpur Ashadhi Ekadashi | यंदा आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाकडून आनंदाची बातमी दिली आहे. यंदा आषाढी यात्रेनिमित्त भाविकांसाठी एसटीने ५ हजार विशेष गाड्यांचं नियोजन केलं आहे.

यंदा राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा जास्त भाविक असतील तर त्यांनी मागणी केल्यास थेट त्यांच्या गावातून एसटी बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी भाविकांनी आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधावा असं आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आलं आहे. या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत.

हेही वाचा    –      डोंबिवलीत पुन्हा स्फोट, एमआयडीसीच्या फेज-2 मध्ये एका कंपनीला भीषण आग 

चार तात्पुरती बस स्थानके उभारणार

पंढरपूर यात्रेसाठी राज्यभरातील लाखो भाविकांसाठी विविध विभागांतून गाड्या सोडण्यात येणार आहेत. वारकरी, भाविक तसेच पर्यटकांची होणारी गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये, यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्रा काळात बस स्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येणार असून जास्तीत जास्त भाविक-प्रवाशांनी एसटीच्या सुरक्षित प्रवासी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button