ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

एक्झर्बिया अॅबोड रहिवाशी गणेश मंडळाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ काळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

27 सप्टेंबर रोजी समाज प्रबोधन या विषयावर व्याख्यान

वडगाव (मावळ): आपल्या समाजात एकीकडे बर्‍याच वैचारीक चर्चा होतात. तर त्याच वेळी दूसरीकडे जुन्या विचारसरणीचा पगडा दिसतो. आजचा समाज हा अधिकाधिक आत्मकेंद्री होत चालला आहे, यामध्ये नकारात्मक भावना दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी समाज प्रबोधनात्मक व्याख्यानांद्वारे समाज योग्य रीतीने चालू आहे. अशा वेळी आज खऱ्या अर्थाने माणूस घडविणारे संस्कार आणि शिक्षण देण्याची गरज आहे, हा उदात्त हेतू समोर ठेवून एक्झर्बिया अॅबोड गणेश मंडळाच्यावतीने ज्येष्ठ पत्रकार जगन्नाथ काळे यांच्या समाज प्रबोधनात्मक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

27 सप्टेंबर रोजी गणेशाच्या आरतीनंतर सायंकाळी 8.00 वाजता पत्रकार काळे यांचे व्याख्यान आयोजित केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न शिरोडकर, उपाध्यक्ष सुनील पवार, खजिनदार पंढरीनाथ हिंगे, सचिव दिनेश सकट, दीपक पाटील यांनी दिली.

लेखक, व्याख्यानकार, कथाकथनकार अशी ख्याती असलेले पत्रकार जगन्नाथ काळे यांचे पुणे आकाशवाणीवर देखील विविध कार्यक्रम होत असतात. त्यांनी लिहिलेला रस्ता, उड्डाण हे कथासंग्रह खूप गाजलेले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button