Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओएनजीसीचा गेमचेंजर प्लॅन! समुद्रात धावणार भारताची महाकाय मालवाहू जहाजे

मुंबई : ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) साठी 28 जानेवारीचा दिवस अत्यंत लाभदायक ठरला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर कंपनीचा शेअर 5.77% नी वधारून 263.10 रुपयांवर पोहोचला. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे कंपनीने जपानच्या मित्सुई ओ.एस.के. लाईन्स आणि दक्षिण कोरियाच्या सॅमसंग हेवी इंडस्ट्रीज सोबत केलेले धोरणात्मक करार होय.

या करारानुसार, दक्षिण कोरियामध्ये दोन अतिप्रचंड व्हेरी लार्ज इथेन कॅरियर्स बांधली जाणार आहेत. ही जहाजे ओपलसाठी अमेरिकेतून इथेन वायूची वाहतूक करतील.

हेही वाचा – मुंबईची हवा पुन्हा बिघडली; 45 स्टेशन्सवर वायू प्रदूषण धोक्याच्या पातळीवर

प्रत्येक जहाजाची मालवाहू क्षमता 1 लाख घनमीटर असेल. ही जहाजे वर्ष 2028-29 पर्यंत भारतीय ताफ्यात सामील होतील. त्यांचे संचालन गुजरातच्या गिफ्ट सिटीमध्ये स्थापन भारत इथेन वन आणि भारत इथेन टू या संयुक्त उपक्रमांद्वारे होईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button