breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

Nirbhaya Gang rape : दोषींना उद्या सकाळी 6 वाजता फाशी होणार

मुंबई | महाईन्यूज

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना अखेर फाशीची शिक्षा देण्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे. पटियाला न्यायालयानं दिलेल्या निर्णयानुसार मंगळवारी फाशी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

दोषी पवनकुमार गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. आज बंद कॅमेरात पवनच्या क्युरेटिव्ह याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीनंतर पटियाला न्यायालयानं आज डेथ वॉरंटमध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं म्हटलं आहे. दोषी पवनने आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला आहे.

दिल्ली कोर्टाने 17 फेब्रुवारीला चारही दोषींना 3 मार्चला एकत्रित फाशी देण्याचा निर्णय दिला होता. आतापर्यंत कोर्टाने या चौघांसाठी तीन वेळा डेथ वॉरंट जारी केलं आहे. पहिल्या दोन वेळेला दोषींनी कायद्यानं ठोठावल्याने फाशीची तारीख पुढे ढकलावी लागली. आता तिसऱ्यांदा डेथ वॉरंट जारी झालं आहे. पण याहीवेळी फाशीच्या आधी दोन दोषींनी याचिका दाखल केल्या होत्या.

फाशीच्या शिक्षेऐवजी जन्मठेप करावी

पवनने गुन्हा केला तेव्हा तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. त्याला फाशीची शिक्षा न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी विनंती केली आहे. पवनचे वकील एपी सिंह यांनी क्युरेटिव्ह याचिका दाखल करीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा फेटाळण्याची मागणी केली आहे. शुक्रवारी पवनने दाखल केलेल्या या याचिकेवर आज 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली. चार दोषींपैकी पवन हा क्युरेटिव्ह याचिका करणारा शेवटचा गुन्हेगार आहे. फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी त्याची विनंती आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button