breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालघर जिल्ह्यात ५ एप्रिलपासून नवे निर्बंध जारी! शाळा, कॉलेज बंद

पालघर – जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली मोठी वाढ लक्षात घेऊन प्रशासनाने येत्या ५ एप्रिलपासून नवे कडक निर्बंध जारी केले आहेत. यनिर्बंधानुसार पालघर जिल्ह्यातील शाळा, कॉलेज , खाजगी क्लासेस तसेच सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम पुर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुकाने, मॉल्स, हातगाडी व ठेल्यांवरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांसह अनेक बाबींवर वेळेचे व नागरिक क्षमतेचे बंधन लादण्यात आले आहे.
पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची जिल्ह्यातील कोविड परिस्थितीबाबत आढावा बैठक पार पडली. येत्या ५ एप्रिलपासून विविध बाबींवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार,५ एप्रिलपासून जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजेस व कोचिंग क्लासेस पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहेत. चालू शैक्षणिक वर्षातील १० वी व १२ वी च्या परीक्षा मात्र जाहीर वेळेत होतील.

जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंतच सुरु राहतील. मात्र ही अट जिवनावश्यक वस्तू, दूध, पेट्रोल पंप व औषधांच्या दुकानांना लागू राहणार नाही. १५ एप्रिलपर्यंत पुर्वनियोजित असलेल्या लग्न व इतर समारंभ सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत आयोजित करण्यास परवानगी असणार आहे. अत्यंविधी कार्यक्रमामध्ये देखील २० पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही. हॉटेल्स व बार सकाळी ७ ते रात्री पर्यंत सूरु राहतील. होम डिलिव्हरीचे किचन रात्री १० वाजेपर्यंत सूरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे देखील संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सूरु राहतील. हातगाडी आणि स्टॉल सकाळी ७ ते संध्याकाळी ८ वाजेपर्यंत सुरू राहतील .हे निर्बंध ५ एप्रिलपासून लागू होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button