ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

संत निरंकारी मिशनकडून मानव एकता दिनानिमित्त देशव्यापी रक्तदान अभियान

रक्तदानातून तयार होतात रक्ताची नाती - निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज

पुणे : ’रक्तदान हे केवळ एक सामाजिक कार्य नसून मानवीयतेचा असा एक दिव्य गुण आहे जो योगदानाची भावना दर्शवितो आणि त्यातून रक्ताची नाती निर्माण होतात’ असे उद्गार निरंकारी सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी देशभर आयोजित रक्तदान श्रृंखलेच्या पार्श्वभूमीवर ग्राउंड नं. २, निरंकारी चौक, दिल्ली येथे आयोजित केलेल्या ‘मानव एकता दिवस’ समारोहाच्या वेळी विशाल जनसमूदायाला संबोधित करताना व्यक्त केले.

संत निरंकारी मंडळाचे पुणे झोन चे प्रमुख आदरणीय ताराचंद करमचंदानी जी यांनी या देशव्यापी रक्तदान अभियानाची माहिती देताना सांगितले, की संत निरंकारी सत्संग भवन, गंगाधाम, पुणे येथे ११८० यूनिट तर संपूर्ण भारतवर्षामध्ये ५०००० हून अधिक रक्त संकलित करण्यात आले.

सदगुरु माताजींनी मानव परिवाराला संबोधित करताना सांगितले, की रक्तदान हे निष्काम सेवेची अशी एक सुंदर भावना असते ज्यामध्ये सकळीकांच्या भल्याची कामना निहित असते. त्यामध्ये अशी भावना उत्पन्न होत नाही, की केवळ आपले सगे-सोयरे किंवा आपले कुटुंबच महत्वपूर्ण आहे, तर अवघे विश्वच आपला परिवार बनून जाते.

निरंकारी जगतामध्ये ‘मानव एकता दिवस’ युगप्रवर्तक बाबा गुरबचनसिंहजी यांच्या प्रेरणादायी शिकवणूकीला समर्पित आहे. त्याबरोबरच सेवेचे पुंज, पूर्ण समर्पित गुरुभक्त चाचा प्रतापसिंह व अन्य महान बलिदानी संतांचेही या दिवशी स्मरण केले जाते. ‘मानव एकता दिवस’ या दिवशी संपूर्ण देशामध्ये जागोजागी सत्संग समारोह आणि विशाल रूपात रक्तदान शिबिरांच्या श्रृंखलेचे आयोजन केले जाते. त्यानंतर रक्तदान शिबिरांची ही श्रृंखला वर्षभर चालू राहते.

रक्तदानाचे महत्व समजावताना सदगुरु माताजींनी म्हटले, की ‘रक्त नाड्यांमध्ये वाहावे, नाल्यांमध्ये नव्हे. रक्त देताना ते कोणत्या शरीरामध्ये जाईल याचा आपण विचार करत नाही. हे तर एक मानवी मूल्यांचे दर्शन घडविणारे सामाजिक कार्य आहे. निरंकारी राजपिता रमितजी यांनी स्वत: रक्तदान करुन याचे प्रत्यक्ष उदाहरण प्रस्तुत केले.

या रक्तदान शिबिराला सुनील शिंदे (आयकर विभाग), माधुरी मिसाळ (मा. आमदार), स्मारथना पाटील (पोलीस उपायुक्त), सुनील भाऊ कांबळे (मा. आमदार) तसेच विभागातील नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपली उपस्थिती दर्शिवली. या रक्तदान शिबिरामध्ये वाय.सी.एम रुग्णालय रक्तपेढी यांनी ५५० युनिट, ससून रुग्णालय रक्तपेढी यांनी ६३० युनिट रक्त संकलन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button