नाथाभाऊंच्या जावयाला कोर्टाकडून मोठा दिलासा
पुण्यात सुरू असलेल्या रेव्ह पार्टीतून पोलिसांनी ताब्यात घेतले

मुंबई : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर हे चांगलेच अडचणीत सापडले. पुण्यातील खराडी भागात त्यांना रेव्ह पार्टी करताना पोलिसांनी रंगेहात पकडले आणि राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली. यानंतर काही गंभीर आरोप हे खेवलकर यांच्यावर करण्यात आली. अनेक महिलांचे त्यांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ सापडल्याचा दावा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी केला. यासोबतच नाथाभाऊंच्या जावयावर आरोप करत चाकणकर यांनी म्हटले होते की, हे खूप जास्त मोठे रॅकेट आहे आणि अनेक महिलांना खेवलकरांनी फसवले. पतीवर झालेल्या गंभीर आरोपांनंतर रोहिणी खडसे या पतीसाठी मैदानात उतरल्याचे बघायला मिळाले.
पतीसाठी कोर्टात कोर्ट खालून रोहिणी खडसे दिसल्या. योग्यवेळी मी सर्व गोष्टींवर उत्तरे देईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आता रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकरला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. काही महिन्यानंतर कोर्टाने खेवलकरचा जामीन अखेर मंजूर केलाय. जावयाला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनीही काही गंभीर आरोप केले होते. मात्र, त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, मी जावयाचे समर्थन करणार नाही, जर तो चुकीचा असेल तर.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
पतीला अटक झाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी शरद पवार यांचीही पुण्यात भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी रोहिणी खडसे यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. हेच नाही तर पुण्यात अशाप्रकारची पार्टी करण्याची प्रांजल खेवलकरची पहिली वेळ नव्हती. काही दिवसांपूर्वीच त्याच फ्लॅटमध्ये अशाप्रकारची पार्टी करण्यात आल्याचे पुढे आले. पतीला अटक झाल्यानंतर रोहिणी खडसे यांनी पुण्यात धाव घेतली.
प्रांजल खेवलकर यांच्या पार्टीतून काही महिलांना देखील पोलिसांनी अटक केली होती. शेवटी आता अत्यंत मोठा दिलासा खेवलकरला मिळालाय. पतीला जामीन मिळाल्यानंतर रोहिणी खडसे या प्रकरणावर काही भाष्य करणार का? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले. प्रांजल खेवलकरला फसवण्यात आल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले होते.