मुंबई झोन वनच्या ईडीच्या पथकाकडून छापेमारीची कारवाई
ED ने मुंबईत आठ ठिकाणी टाकली रेड
मुंबई : मुंबईत ईडीने आज छापेमारीची कारवाई केली आहे. ईडीच्या मुंबई झोन वनच्या पथकाकडून मोठी छापेमारीची कारवाई करण्यात आली. फैजल शेख आणि अल्फिया शेख यांच्या ड्रग सिंडिकेटवर कारवाई झाली. ड्र्ग्ज विक्रीतून मिळवलेला पैसा हा मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून फिरवल्याचा संशय आहे. सलेम डोला ड्रग्ज तस्करीमधील मोठं नाव आहे. आधीपासून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. सलीम डोला दाऊद टोळीशी संबंधित आहे.
ईडीकडून मुंबईच्या डोंगरी परिसरात सर्च ऑपरेशन सुरु आहे. मुंबईत एकूण आठ ठिकाणी ईडीकडून छापेमारीची कारवाई करण्यात आली आहे. ड्रग सिंडिकेटचा प्रमुख सलीम डोला हा भारताबाहेर आहे. त्याच्या नेटवर्कच्या माध्यमातून ड्रग तस्करी सुरु होती. फैजल शेख आणि अल्फिया शेख यांच्याशी संबंधित डोंगरी येथे ईडीकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. तपास यंत्रणा सलीम डोलाच्या मागावर आहेत. भारतात त्याचं कसं प्रत्यर्पण होईल याचा प्रयत्न आहे. ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकरणी गुन्हा दाखल केलाय. सलीम डोला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित आहे.
हेही वाचा : “शरद पवारांचे मानस पुत्र विजय कोलते यांनी अहिल्यांच्या जागा लाटल्या”; प्रा. लक्ष्मण हाके
देशभरात 15 ठिकाणी छापेमारी
आज पहाटेपासून ईडीकडून छापेमारीची कारवाई सुरु आहे. एमडी ड्रग हे मोठ्या किंमतीला विकलं जातं. आज ईडीकडून देशभरात 15 ठिकाणी छापेमारीची कारवाई झाली. नवी दिल्ली, गुरगाव येथे छापेमारीची कारवाई झाली. बनावट कॉल सेंटर प्रकरणी छापेमारीची कारवाई सुरु आहे. डिजिटल पुरावे गोळा करण्यावर भर दिला जात आहे.




