महापालिका आरक्षणामूळे २५ हून अधिक विद्यमान नगरसेवक निवडणूक रिंगणाबाहेर
![More than 25 existing corporators are out of the election arena due to municipal reservation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/More-than-25-existing-corporators-are-out-of-the-election-arena-due-to-municipal-reservation.png)
अकोला : अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण आज जाहीर झालं. या आरक्षणामूळे २५ पेक्षा जास्त विद्यमान नगरसेवकांना निवडणूक रिंगणाबाहेर रहावे लागणार आहे. अकोला महापालिकेत एकूण ९१ जागा असून एकूण ४६ जागा महिलांसाठी राखीव आहेत. तर १५ जागा अनुसूचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातींसाठी राखीव आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने इतर मागास वर्गाचे आरक्षण नाकारल्याने एकूण ७४ जागांवर खुल्या प्रवर्गासाठी राहणार आहेत. एकूण ९१ जागांमधील ४६ जागा महिला प्रवर्गाकरिता आरक्षित करताना ८ जागा अनुसूचित जाती महिला आणि एक जागा अनुसूचित जमाती महिलांसाठी जाहीर झाली. तर उर्वरित ३७ जागा सर्व साधारण प्रवर्गातील महिलांसाठी जाहीर झाल्या. दरम्यान, महापालिकेच्या एकूण ३० प्रभागातून ९१ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहे. २९ प्रभागातून तीन तर एका प्रभागातून चार नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत.
नुसूचित जाती माहिलांसाठी आरक्षित जागा…
अनुसुचित जातीच्या लोकसंख्येनुसार उतरत्या क्रमाने एकूण १५ प्रभागातील अनुसूचित उमेदवाराकरीता आज चिठ्ठया टाकून आरक्षण सोडत जाहीर झाली. यामध्ये सात जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहेत. ज्यात ३-अ, ६-अ, ९-अ, १०-अ, १२-अ, १८-अ, १९-अ, आणि २३-अ जागा आहे. तर अनुसूचित जमातीसाठी ‘२४-अ’ ही जागा महिलांसाठी राखीव करण्यात आली आहे.
सर्वसाधारण महिलांसाठी अशा आहेत आरक्षित जागा…
आणि सर्वसाधारण महिलांसाठी ३७ जागा राखीव आहेत. ज्यामध्ये १-अ, ५-अ, ७-अ, ८-अ, ११-अ, १३-अ, १५-अ, १६-अ, १७-अ, २१-अ, २२-अ, २६-अ, २८-अ, तर ‘ब’ जागांसाठी २-ब, ३-ब, ४-ब, ६-ब, ९-ब, १०-ब, १२-ब, १४-ब, १८-ब, १९-ब, २०-ब, २३-ब, २४-ब, २५-ब, २७-ब, २९-ब, ३०-ब या जागा आरक्षित झाल्या होत्या. तर उर्वरित ७ जागा ‘ज्या’ प्रभागात २ जागा अनारक्षित आहे. त्या प्रभागातून चिठ्ठया टाकून आरक्षित केल्या आहे. ज्यामध्ये १-ब, ५-ब, ८-ब, १५-ब, १७-ब, २६-ब, २८-ब या जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित आहेत. अशा एकूण ३७ जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.