मनसेचं नवी मुंबईत जोरदार शक्ती प्रदर्शन; अमित ठाकरे स्वतः नेरुळ पोलीस स्थानकात जाऊन नोटीस स्वीकारणार

Amit Thackeray : नेरुळच्या शिवस्मारकाचं बेकायदेशीर उद्घाटन केल्या प्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान नुकतेच अमित ठाकरे यांना नोटीस देण्यासाठी नवी मुंबई पोलीस शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. मात्र अमित ठाकरे यांनी येवेळी नोटीस स्वीकारली नाही. तुम्ही त्रास का घेतला, मी स्वतः पोलीस स्टेशनला आलो असतो असे म्हणत अमित ठाकरेंनी हि नोटीस स्वीकारली नाही. दरम्यान, आज (रविवार) अमित ठाकरे हे स्वतः नेरुळ पोलीस स्थानकात स्वतः जाणार असल्याचे पुढे आले आहे. अमित ठाकरे हे स्वतः नेरुळ पोलीस स्थानकात जाऊन आता नोटीस स्वीकारणार आहे.
दरम्यान, यावेळी अमित ठाकरें सोबत मनसे नेते बाळा नांदगावकर,नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, यशवंत किल्लेदार या प्रमुख मनसेच्या नेत्यांसह मुंबईतील विभाग अध्यक्षही सोबत जाणार आहेत. यावेळी मनसेच शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार असल्याची चर्चा आहे. साडे अकरावाजेच्या दरम्यान अमित ठाकरे नवी मुंबईसाठी रवाना होणार आहेत. तर वाशी टोल नाक्यावर तासाभरात पोहचून तेथे नवी मुंबईतील मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांचं स्वागत करतील. त्यानंतर नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पोहचून अभिवादन करतील. त्यानंतर रॅलीद्वारे नेरूळ पोलीस स्टेशनला पोहचणार आहेत.
हेही वाचा – ‘मतदार यादीवर प्राप्त होणाऱ्या सूचनांची गांभिर्याने दखल घ्या’; आयुक्त श्रावण हर्डीकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे हे 16 नोव्हंबर रोजी नवी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. अमित ठाकरे हे शाखेच्या उद्घटनासाठी आले असता त्यांना असं कळलं की, नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे अनावरण गेल्या अनेक महिन्यांपासून झालेलं नव्हतं. तसेच महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवली होती. हे बघताच अमित ठाकरेंनी स्व:त या पुतळ्याचे अनावरण केलंय. यावेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तर पोलीस आणि मनसे सैनिकांमध्ये काही काळ झडप झाल्याचेही चित्र बघायला मिळेल. या कृत्यासाठी माझ्यावर कारवाई होते असेल तर ही माझ्या आयुष्यातील पहिली केस होणार आहे. मात्र वेळ आली तर महाराजांसाठी अशा अनेक केसेस अंगावर घेवू, असा पवित्र अमित ठाकरेंनी घेतला होता.




