साईभक्तांसाठी महत्वाची बातमी! आजपासून शिर्डीत ‘नो मास्क नो दर्शन’
![Masks compulsory for devotees coming for Sai Darshan in Shirdi](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/12/Shirdi-Sai-Baba-Mandir-780x470.jpg)
मुंबई : साईभक्तांसाठी एक महत्वाची बातमी आहे. शिर्डीत साई समाधी दर्शन घेण्यासाठी संपूर्ण जगभरातून भाविक शिर्डीला येत असतात. मात्र आता कोरोनाच्या जेएन.1 (JN.1) या नव्या विषाणूने जगाची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत.
या पार्शवभूमीवर शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भाविक आणि ग्रामस्थांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. ज्या भाविकांकडे मास्क नसेल त्यांना दर्शनासाठी प्रवेश मिळणार नाही.
हेही वाचा – थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनला फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर या ठिकाणांना भेट द्या..
तसेच दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रवेशद्वाराजवळ मास्क उपलब्ध करून द्यावे अशा सूचना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी साईबाबा संस्थानचे कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांना दिल्या आहेत. महत्वाचं म्हणजे या सूचनेची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. त्यामुळे आता साईभक्तांना मास्क बंधनकारक असणार आहे.