breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘मराठा तरुणांनो उद्योग व्यवसायात उतरा’; प्रवीण गायकवाड

संभाजी ब्रिगेडचा सह्याद्री फार्म अभ्यास दौरा प्रेरणादायक

नाशिक : संभाजी ब्रिगेडचा व्यवसायिक अभ्यास दौरा २० व २१ जूलै रोजी नाशिक येथील सह्याद्री फार्मचा शेतकरी उद्योग पाहण्यासाठी दोन दिवसीय अभ्यास दौरा आयोजित केला होता.कार्यकर्त्यांच्या डोक्यात शिवाजी आणि खिशात गांधीजी असायलाच हवेत असे प्रवीण गायकवाड नेहमी सांगत असतात.कार्यकर्ता आर्थिक सक्षमीकरण होने काळाची गरज आहे या विचारातूनमहाराष्ट्राला फक्त भूगोल नाही तर इतिहास देखील आहे असे आम्ही नेहमीच अभिमानाने म्हणत असतो.

हे खरे असले तरी फक्त इतिहासात न रमता त्यातून प्रेरणा घेत वर्तमानात देखील काही माणसे जिद्द,साहस आणि दूरदृष्टीने नवा इतिहास घडवत आहेत.भविष्याकाळात इतिहास म्हणून जेंव्हा केंव्हा लिहिले जाईल किंवा सांगितले जाईल तेंव्हा तेंव्हा अश्या माणसांची दखल घेतल्याशिवाय इतिहास पूर्ण होणार नाही असे काम समर्पण भावनेने करत आहेत. आपापल्या क्षेत्रातील शिवाजी अश्या सर्वोच्च उपाधीला सार्थ ठरवतील असे सह्याद्री सम भव्यदिव्य कार्य ही व्यक्तिमत्त्व करत आहेत.

हेही वाचा     –      ‘नवरत्न’ अर्थसंकल्पात युवा भारताचे प्रतिबिंब; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया 

असेच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला संभाजी ब्रिगेड अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने भेटण्याचा योग आला. नाशिक जिल्ह्यात शेती-माती साठी आणि तिथल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे आणि फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर भारतासह जगाला देखील अभिमान वाटावा असे काम संघटितपणे एकत्र येत सह्याद्री फार्मच्या माध्यमातून विश्व निर्माण करणारे चेअरमन विलास शिंदे ठरले आहेत.
विलास शिंदे यांचा सर्व प्रवास आणि पुढील भविष्यातील वाटचाल ही भारावून टाकणारी होती.

द्राक्ष निर्यात करणारी भारतातील प्रमुख निर्यातदार म्हणून आज सह्याद्री फार्मचे नाव आदराने घेतले जाते.या माध्यमांतून हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी सह्याद्री कारणीभूत आहे.टोमॅटो प्रक्रिया उद्योग पाहण्यासारखा आहे.
सध्या येथे हिंदुस्थान लिव्हरचा ब्रँड असलेले किसान टोमॅटो सॉस,जॅम बनवले जात आहे ही देखील उल्लेखनीय बाब आहे.
डाळिंब,केळी यावर देखील शाश्वत काम केले जात आहे.सह्याद्री फार्मचा परिसर आणि जागतिक दर्जाचे बांधकाम,स्थापत्य हे बघण्यासारखे आहे.आम्हाला हा परिसर अभ्यासण्याची आणि सह्याद्री फार्मचे चेअरमन विलास शिंदे यांच्या सोबत संवाद साधत त्यांचा प्रवास समजून घेण्याची संधी मिळाली.

जात आणि भावना यांचा काला करून समाजाला अधिकाधिक मर्यादित-संभ्रमित करू पाहणाऱ्या शॉर्टकट संकल्पना रूढ होत असताना प्रवाहाच्या विरोधात जाऊन “नवी दिशा नवा विचार” मांडत सामाजिक संघटना म्हणून आपल्या सोबत जोडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला भावनिक आणि मर्यादित करणाऱ्या चौकटीतून बाहेर काढत इतिहासात रमणाऱ्या असंख्य तरुणांना आता आपण जगाला आपली ओळख “बिजनेस कम्युनिटी” म्हणून करून दिली पाहिजे असे ठामपणे सांगत अशी मानसिकता तयार करण्यासाठी सतत कृती कार्यक्रम देणारे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड यांच्यामुळेच

2 दिवसांचा हा अभ्यास दौरा खरोखर प्रचंड ऊर्जा देणारा होता.पण फक्त भारावून न जाता खऱ्या अर्थाने प्रेरणा घेवून असे काम आणि मेहनत जर आपापल्या क्षेत्रात केली तर मराठा तरुणांना यश नाही यशाच्या शिखरावर आपण पोहचणार यासाठी मराठा तरुणांनी उद्योग व्यवसायात उतरलेच पाहिजे असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले. या अभ्यास दौऱ्यासाठी शंभर पदाधिकाऱ्यांचे शिबिर आयोजित केले होते. यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातून सतिश काळे,गणेश दहिभाते,वैभव जाधव,रविशंकर पवार,स्वप्निल परांडे हे उपस्थित होते

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button