ताम्हिणी घाटात ट्रॅव्हल बसचा मोठा अपघात, २ महिला ठार तर ५५ जखमी
Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात आज सकाळी झालेल्या अपघातामध्ये दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन महिला मृत्यूमुखी पडल्या असून ५५ जण जखमी झाले आहेत. सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला असून जखमींवर नजीकच्या माणगाव उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ताम्हिणी घाटात सकाळी साडेसातच्या सुमारास एमएच ०४ एफके ६२९९ ही खासगी ट्रॅव्हल बस पुण्याहून माणगावच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार बसचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला गेल्यानं पलटली.
हेही वाचा – ठाकरे गटाच्या लोकसभेच्या २३ जागा ठरल्या! ‘या’ जागा लढण्यावर ठाम
Maharashtra | Two people died and 55 got injured after a travel bus overturned in the Tamhani Ghat area of Raigad under the Mangaon police station area at around 7.30 am today. The injured were taken to the nearest hospital for treatment: SP Raigad, Somnath Gharge pic.twitter.com/zyXvMS4vAf
— ANI (@ANI) December 30, 2023
अपघात झाल्यानंतर आसपासच्या काही वाहन चालकांनी अपघातग्रस्तांना बसमधून बाहेर काढण्यासाठी तातडीने धाव घेतली. काही काळानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अपघातग्रस्तांना नजीकच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं.