जेजुरीत मोठा अपघात टळला; ब्रेक फेल झालेली शिवशाही बस घराच्या भिंतीला धडकली
जेजुरीत एसटी बसच्या ब्रेक फेल होऊन घराच्या भिंतीला धडक, सुदैवाने अनर्थ टळला

पुणे | जेजुरीत मंगळवारी सकाळी एक मोठा अपघात टळला, जेव्हा शिवशाही एसटी बस ब्रेक फेल होऊन घराच्या भिंतीला धडकली. पुणे-पंढरपूर मार्गावर असलेल्या जेजुरी एसटी बस स्थानकातून सकाळी साडे सातच्या सुमारास बस (नंबर MHO6BW4347) स्वारगेट-पंढरपूर मार्गावर निघाली होती. अचानक बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे ती रस्त्यावर आडवी गेली आणि समोरच्या एका घराच्या भिंतीला धडकली. या अपघातामुळे घराच्या भिंतीला मोठे बगदाड पडले, परंतु सुदैवाने घरात कोणही नसल्यामुळे आणि सकाळी वाहतूक कमी असल्यानं मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळी नागरिकांनी आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मार्गावर अद्याप वाहतूक नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. यापूर्वीही या मार्गावर भरधाव वेगाने धावणाऱ्या खाजगी बसने हॉटेलमध्ये घुसण्याचा एक भयंकर प्रकार घडला होता. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.
हेही वाचा : केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता; वनमंत्री गणेश नाईक

नागरिकांनी प्रशासनावर आरोप करत, या मार्गावर वेगाची कोंडी आणि उतारामुळे भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या मते, प्रशासनाने या मार्गावर वेग कमी करणारे उपाय किंवा उड्डाण पुलाचा विचार करावा, अन्यथा भविष्यात अजून मोठे अपघात होण्याची भीती आहे. सध्या प्रशासनाने अपघाताची शहानिशा सुरू केली असून, पुढील काळात आवश्यक उपाययोजना घेण्याचे आश्वासन दिले आहे.




