Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उत्पादन शुल्कात 10 रुपयांची मोठी कपात; राज्यातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर जाहीर

Petrol Diesel Price | मध्य पूर्वेतील तणावामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होत असताना देशांतर्गत ग्राहकांवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात मोठी कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने दोन्ही इंधनांवरील उत्पादन शुल्कात थेट 10 रुपयांची कपात केल्याने संभाव्य दरवाढ टळली असून इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्यास मदत झाली आहे.

या निर्णयानुसार पेट्रोलवरील विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क 13 रुपयांवरून 3 रुपयांवर आले असून डिझेलवरील शुल्क पूर्णपणे शून्य करण्यात आले आहे. सरकारच्या या पावलामुळे ग्राहकांना तातडीने दिलासा मिळाला असला तरी केंद्र सरकारच्या महसुलावर मोठा परिणाम होणार असून वार्षिक सुमारे 1.70 लाख कोटी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, इंधन निर्यातीवर पुन्हा विंडफॉल टॅक्स लागू करण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे.

इंधन खरेदीसाठी पेट्रोल पंपांवर वाढलेली गर्दी लक्षात घेता नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने आजपासून जमावबंदी लागू केली आहे. आज सकाळी 6 वाजेपासून ते 11 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी नागरिकांना इंधनाचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा      :          चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का! एमएस धोनी दुखापतीमुळे पहिले २ आठवडे बाहेर

महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 अंतर्गत जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार पाच किंवा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र पोलीस, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा आणि परवानगी घेतलेल्या धार्मिक मिरवणुकींना यामधून सूट देण्यात आली आहे. सभा आणि मोर्चांसाठी परवानगी देण्याचे अधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहेत.

दरम्यान, राज्यातील विविध शहरांमधील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले असून अहिल्यानगरमध्ये पेट्रोल 104.59 रुपये आणि डिझेल 91.12 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. अकोल्यात पेट्रोल 104.22 आणि डिझेल 90.78 रुपये, अमरावतीत पेट्रोल 105.47 आणि डिझेल 91.28 रुपये, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 105.18 आणि डिझेल 91.68 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

याशिवाय भंडारा येथे पेट्रोल 105.21 आणि डिझेल 91.74 रुपये, बीडमध्ये पेट्रोल 104.83 आणि डिझेल 91.01 रुपये, बुलढाण्यात पेट्रोल 104.46 आणि डिझेल 91.36 रुपये, गोंदियात पेट्रोल 105.64 आणि डिझेल 92.15 रुपये, नागपूरमध्ये पेट्रोल 104.05 आणि डिझेल 90.61 रुपये, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 104.73 आणि डिझेल 91.27 रुपये दराने विकले जात आहे. राज्याची राजधानी मुंबईत पेट्रोल 103.54 रुपये आणि डिझेल 90.03 रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button