breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबई

कीर्तन महोत्सवात महाराजांची हेलिकॉप्टरने एंट्री

पुणे : वाघोली येथे शांताराम कटके यांच्या वतीने भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कीर्तन महोत्सवासाठी चक्क सांगली येथून ह.भ.प समाधान महाराज शर्मा यांना हेलिकॉप्टर मधून कार्यक्रम स्थळी आणण्यात आले आहे. या कीर्तन सोहळ्याची आणि या हेलिकॉप्टर एंट्रीची जोरदार चर्चा सुरू आहे.
केज तालुक्यातील रामकथाकार, कीर्तनकार समाधान महाराज शर्मा यांची सांगली येथे रामकथा सुरू आहे. त्यांना पुण्यातील वाघोली येथे सुरू असलेल्या कीर्तन महोत्सवात गुरुवार, ५ जानेवारी २०२३ रोजी कीर्तनाचे निमंत्रण देण्यात आले होते. परंतु, सांगली ते वाघोली हे अंतर पाच तास १७ मिनिटांचे होते आणि शर्मा महाराज यांची गुरुवारची रामकथा सायंकाळी पाच वाजता संपणार होती. दोन तासांत महाराजांना कारने वाघोली येथे पोहोचणे आवश्यक होते.
कारने हा प्रवास करण्यासाठी महाराजांना पाच तास लागणार होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन महाराजांच्या कीर्तनासाठी आयोजक शांताराम खटके व भाविकांनी त्यांच्यासाठी थेट सांगली ते वाघोली अशी महालक्ष्मी कंपनीच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली. सांगली ते वाघोली अंतर २४७ किमी आहे. रस्त्याने येण्यास ५ तास लागत असल्याने महाराजांना ५५ मिनिटांत कीर्तनस्थळी आणले. वाघोली येथे तीन दिवसांपासून कीर्तन महोत्सव सुरू झालेला असून गुरुवारी तिसऱ्या दिवसाचे कीर्तन शर्मा महाराज यांचे होते.
शर्मा महाराजांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता यावा म्हणून आयोजक शांताराम खटके मित्रमंडळासह हरिदास जोगदंड, रवींद्र थोरात, रोहिदास खटके, सोमनाथ खटके, सोमनाथ आव्हाळे, बबन जायभाय, गणेश हारगुडे यांनी पुढाकार घेत वाघोली येथे हेलिकॉप्टर येताच महाराजांचे जोरदार स्वागत केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button