ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

मोठ्या प्रमाणावर थंडी वाढली, अंड्यांना मागणी प्रचंड वाढली

ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार

मुंबई : राज्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर थंडी वाढली असून त्यामुळे एकीकडे अंड्यांना मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अंड्याचे भाव कडाडले आहेत. थंडीत अंड्यांना सकस आणि उब देणारा आहार म्हणून पाहिले जाते. कोंबडीच्या अंड्यांना थंडीत प्रचंड मागणी असते त्यामुळे पुरवठा आणि मागणी यांच्या संतुलन बिघडून अंड्याचे दर थंडीत कडाडतात. आता राज्यातील अंड्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.

अंडी खाणाऱ्यांसाठी वाईट बातमी आहे. अंड्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. मागणी जास्त आणि पुरवठा कमी झाल्याने अंड्याचा तुडवटा झाला आहे.त्यामुळे अंड्यांचे दर वाढले आहेत. महाराष्ट्रात अंड्याचे दर ऐतिहासिक स्तरावर पोहचले आहे. मागणी वाढल्याने अंडी महागल्या या व्यापारातील तज्ज्ञ सांगतात. छत्रपती संभाजीनगरात किरकोळ भाव प्रति अंडी ७ रुपयांवर पोहचले आहे. राज्यात (Maharashtra Egg Shortage)अन्य भागातही अंड्यांच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे.

छत्रपती संभाजीनगरात अंड्याचे दर १७०, १८० रुपयांवरून सव्वा दोनशे रुपये कॅरेट झाले आहे. अंड्याचे किरकोळ दराकडे पाहाता. हेच दर एका अंड्यामागे आता आठ ते नऊ रुपयांपर्यंत पोहचले आहेत. थंडीच्या दिवसात अंड्याना जास्त मागणी असते आणि अंड्याचे भाव जरी वाढले असले तरी विक्रीकर याचा परिणाम झाला नसल्याचे अंडे व्यापारी सांगत आहेत.

हेही वाचा –  महानगरपालिका निवडणूक मतदार यादी संबंधी २७ नोव्हेंबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करण्याचे आवाहन

आजारामुळे कोंबड्यांचा मृत्यू
महाराष्ट्र पशुपालन विभागाचे अतिरिक्त आयुक्त शीतलकुमार मुकाने यांनी सांगितले की अंड्यांच्या तुटवड्या मागे आंध्रप्रदेश आणि तामिळनाडू येथील प्रमुख पुरवठा हब्समध्ये पावसात पक्षाचे आजारामुळे झालेले मृत्यू मानले जात आहेत. या आजारांमुळे कोंबड्याचा मृत्यू झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अंड्यांच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.

वर्तमान काळात अंड्यांचा पुरवठा मर्यादित असल्याने किरकोळ दुकानात अंड्याच्या किंमतीत वाढ झाली आहे असे व्यापारी आणि किरकोळ विक्रेत्यांनी म्हटले आहे. या दरवाढीमुळे आता सर्वसामान्यांना अंडी खरेदी करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागणार
अंड्यांच्या कमतरता आणि वाढत्या किंमतीमुळे राज्यातील लोकांचे टेन्शन वाढले आहे. जे लोक अंड्यांचा नेहमी आहारात वापर करतात त्यांना आता जास्त पैसे मोजून अंडी खरेदी करावी लागणार आहेत. अंड्यांचा पुरवठा नियमित होण्यासाठी अन्य राज्यांना अंड्यांचा पुरवठा वाढवण्यास सांगण्यात आले आहे.

तज्ज्ञांच्या मते थंडीत अंड्यांची मागणी नेहमीच वाढत असते. यासाठी हवामानाचा प्रभाव आणि पुरवठ्यांतील अडचणी ध्यानात घेऊन राज्यांनी वेळोवेळी पुरेसा स्टॉक बनवून ठेवणे गरजेचे आहे. सध्या अंड्यांच्या ग्राहकांना खर्च करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. शासनाचा विभाग अंड्यांची पुरवठा स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button