breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा साईड बिजनेस, रॅकेट चालू; केतकी चितळेचं स्फोटक व्यक्तव्य

Ketaki Chitale | अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. अनेकदा तिच्यावर टीकादेखील होते. अशातच आता बीड येथील परळी ब्राम्हण ऐक्य परिषदेत केतकी चितळेने अॅट्रोसिटी कायद्याबद्दल भाष्य केलं आहे. अॅट्रोसिटी कायदा रद्द करावा असं ती म्हणाली.

केतकी चितळे म्हणाली की, गेल्या पाच वर्षात किती ॲट्रॉसिटी दाखल झाल्या आहेत? ब्राम्हणांच्या विरोधात किती केसेस दाखल केल्या गेल्या? याची आरटीआयमधून माहिती मागवा. तुम्हाला हा आकडा पाहून धक्का बसेल. कारण हे अख्खं रॅकेट आहे. हे रॅकेट असून यात बरेच वकिल आहेत.

हेही वाचा       –      डिफेन्स एक्स्पोमध्ये १ हजार ३५८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार 

एका वकिलाने गेल्या १५ ते २० वर्षात ६२ ॲट्रॉसिटी केसेसे टाकल्या. मी त्या वकिलांचं नाव घेऊ शकत नाही. पण त्याच्याबरोबर कायम एकच विटनेस असतो. त्याने अलीकडेच दादरच्या एका टिसीवर ॲट्रॉसिटीची केस टाकली. कारण लोकलने प्रवास करत असताना टीसीने थांबवलं. तिकिट भरायला सांगितललं. तर त्याने जात बघून मला अडवलं अशी ॲट्रॉसिटीची केस टाकली. हा फक्त एक वकील आहेत. असे अनेक वकील आहे. अॅट्रॉसिटी हा साईड बिजनेस असून ते मोठं रॅकेट आहे, असं केतकी चितळे म्हणाली.

https://www.facebook.com/Ketaki.Chitale.Official/posts/

केतकी चितळेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मनोज जरांगे यांच्यावर टीका केली. कालचा दिवस फार इंटरेस्टिंग होता. एके ठिकाणी (बरीच वर्षे शिव्या घातल्यावर) ब्राह्मण तुष्टीकरण करताना स्वतःच्या कानांनी ऐकले व डोळ्यांनी बघितले आणि दुसरीकडे, काही किलोमीटर अंतरावर एका मोर्चा धारक ‘महापुरूषांनी’ एका राजकारणी नेत्यांना ब्राम्हण म्हणून अपशब्द वापरले अशी बातमी ऐकली! जय महाराष्ट्र असे म्हणून गप्प बसावे का या सर्कशीत असलेल्या कलाकारांवर हातातील पॉपकॉर्न फेकावे कळत नाहीये. असो, असं तीने म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button