ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

जीवनविद्या मिशन सांगवी शाखेची गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

सद्गुरु वामनराव पै यांच्या सत् शिष्या सुरेखा नर यांची प्रामुख्याने उपस्थिती

नवी सांगवी : जीवनविद्या मिशन सांगवी शाखेच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी झाली. सदर कार्यक्रम पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी सद्गुरु वामनराव पै यांच्या सत् शिष्या सुरेखा नर, मुंबई या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होत्या.

कार्यक्रमात सुरेखा नर यांचे उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. सुरेखा नर यांनी आपल्या प्रवचनात “माफ करा मन साफ करा” असा संदेश दिला तसेच विश्व प्रार्थना आपल्या दाही इंद्रियांनी झाली तर ती तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण करते असेही त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी शिष्यांकडून सद्गुरुपूजन करण्यात आले. युवा नामधरकांनी हरीपाठ सादर केला. बालसंस्कार वर्गातील मुलांनी विशेष कार्यक्रम सादर केले.

यावेळी पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आपल्या भाषणात “जीवन कस जगायच हे जीवनविद्येत आल्यावरच समजत”, असे प्रतिपादन केले. उद्योजक विजय जगताप, नगरसेवक शशिकांत कदम, महेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार, राहूल जवळकर, अमरसिंग आदियाल,प्रकाश लोहार, विलास जगताप, संजय जगताप, उद्योजक शैलेश जोशी, विश्वास देशपांडे, बाळासाहेब मरळ आदी मान्यवर उपस्थित होते.

केंद्र प्रमुख संदीप इंगळे, अंकुश देऊंगळे, नूतन लोखंडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सूत्रसंचालन वृषाली शिंदे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाखेचे अध्यक्ष बाळासाहेब भुरकुंडे, अरुण मनोहर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button