शिर्डीला येणाऱ्या भक्तांसाठी तब्बल ‘इतक्या’ लाखांचा विमा, साईबाबा संस्थानची नेमकी योजना काय?

Shirdi Sai Baba Sansthan | शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा अपघात होऊन यामध्ये अनेकांचा जीव जातो. त्यामुळे भक्तांची सुरक्षा लक्षात घेऊन शिर्डीच्या साईबाबा संस्थानने भक्तांसाठी पाच लाखांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी एका कंपनीशी करार केला असून त्यासाठी लागणारा हप्ताही कंपनीकडे जमा करण्यात आला आहे. यासाठी शिर्डीला येणाऱ्या भाविकांनी संस्थानच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
हेही वाचा : ‘मोदींचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून असेल’; संजय राऊतांचा मोठा दावा
देश-विदेशातील सर्व भक्तांसाठी ही योजना लागू आहे. घरातून निघताना भाविकांनी संस्थानच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची. वाटेत अपघात अगर अन्य दुर्घटना घडली, तर पाच लाखापर्यंतच्या विम्याची नुकसानभरापाई अपगातग्रस्त साईभक्ताला किंवा त्याच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे.