‘गौतमीच्या तीन गाण्याला तीन लाख अन् आम्हाला टाळ..’; इंदुरीकर महाराज
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मारामारी होते
![Indurikar Maharaj said that Gautami's three songs are three lakhs and we should be spared](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/indurikar-maharaj-and-gautami-patil-780x470.jpg)
Gautami Patil : अश्लिल इशारे आणि डान्समुळे गौतमी पाटील हे नाव सातत्याने चर्चेत आहे. अनेक ठिकाणी तिच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ झाले आणि शेवटी गौतमीला माफी मागावी लागली. आता कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी गौतमी पाटील हिच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
गौतमी कार्यक्रमांसाठी मानधन लाखांमध्ये घेते. तिच्या कार्यक्रमांना खूप गर्दी होते. यावरून निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी गौतमीवर टीका केली आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तवलवाडी इथे एका महोत्सवात इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी त्यांनी गौतमी पाटीलवर टोला लगावला आहे.
आम्ही पाच हजार मागितले तर पैशाचा बाजार मांडला, असा आरोप होतो. मात्र तिकडे तीन गाण्यांसाठी तीन लाख मोजतात. तिच्या कार्यक्रमात मारामारी होते, तर काहींचे गुडघे फुटतात. आम्हाला मात्र टाळ वाजवून काहीही मिळत नाही. साधं संरक्षणही दिलं जात नाही, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.