विमान प्रवाशांना इंडिगोची नवीन वर्षाची भेट; अवघ्या 1499 रुपयांत करा हवाई सफर

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच विमान प्रवासाचे नियोजन करणाऱ्यांसाठी देशातील आघाडीची विमान कंपनी ‘इंडिगो’ने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. कंपनीने आपली विशेष न्यू इयर सेल ‘Sail into 2026’ जाहीर केली असून, या अंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही मार्गांवर प्रवाशांना अत्यंत स्वस्त दरात विमान तिकिटे उपलब्ध करून दिली आहेत. या सेलमध्ये देशांतर्गत प्रवासाचे सुरुवातीचे भाडे केवळ १४९९ रुपये इतके माफक ठेवण्यात आले आहे.
इंडिगोने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत माहितीनुसार, ही ऑफर १३ जानेवारीपासून सुरू झाली असून प्रवाशांना १६ जानेवारी २०२६ पर्यंत आपली तिकिटे आरक्षित करता येणार आहेत. या सवलतीच्या दरात बुक केलेल्या तिकिटांवर २० जानेवारी ते ३० एप्रिल २०२६ या कालावधीत प्रवास करता येईल. विशेष म्हणजे, ज्या प्रवाशांना प्रीमियम प्रवासाचा अनुभव घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी कंपनीने निवडक मार्गांवर ‘IndiGoStretch’ सेवा ९९९९ रुपयांपासून उपलब्ध करून दिली आहे. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी विमान उड्डाणाच्या किमान सात दिवस आधी बुकिंग करणे बंधनकारक आहे.
या सेलचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे दोन वर्षांपर्यंतच्या लहान मुलांसाठी असलेले भाडे. इंडिगोच्या डायरेक्ट चॅनेलवरून तिकीट बुक केल्यास, दोन वर्षांखालील बालके देशांतर्गत मार्गावर केवळ १ रुपयात प्रवास करू शकणार आहेत. यासोबतच प्रवाशांना विविध ‘ॲड-ऑन’ सेवांवरही भरघोस सवलत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये फास्ट फॉरवर्ड सर्व्हिसवर ७० टक्के, जादा बॅगेजवर ५० टक्के आणि आवडती सीट निवडण्यासाठी १५ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. तसेच निवडक मार्गांवर जास्तीच्या लेगरूम असलेल्या जागा ५०० रुपयांपासून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
हेही वाचा – जाहीर प्रचार संपला तरी घरोघरी प्रचाराची मुभा; निवडणूक आयोग
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी देखील इंडिगोने स्वस्त दरांचा पिटारा उघडला असून, परदेशवारीचे तिकीट अवघ्या ४४९९ रुपयांपासून सुरू होत आहे. दिल्ली ते ढाका, दिल्ली ते काठमांडू आणि मुंबई ते ढाका यांसारख्या मार्गांवर प्रवाशांना ४४९९ रुपयांत प्रवास करता येईल. याशिवाय मस्कत, अबू धाबी, कुवेत आणि कोलंबो यांसारख्या शहरांसाठीही विशेष सवलतीचे दर जाहीर करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी पुणे ते वडोदरा, पुणे ते सुरत आणि मुंबई ते छत्रपती संभाजीनगर या मार्गांवर १४९९ रुपयांत वन-वे प्रवासाची संधी उपलब्ध आहे.