पिंपरी-चिंचवडमधून चाकणला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होणार, अखेर आळंदी-चाकण बससेवा सुरु, आपच्या पाठपुराव्याला यश
![Pimpri-Chinchwad, Chakan, passengers going, inconvenience will be removed, Alandi-Chakan, bus service started, Aap, success in pursuit,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/07/AAM-ADAMI-PARTY-PCMC-780x470.png)
पिंपरी चिंचवडः
शहरातील अनेक नागरिकांना कामासाठी आळंदी ते चाकण जाण्यासाठी बस बदलत जावे लागत होते, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांना दररोज वाहन न मिळाल्यामुळे अधिक पैसे खर्च करून खाजगी वाहनाने प्रवास लागत होता. सदर समस्या लक्षात घेऊन आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडचे उपाध्यक्ष श्री दत्तात्रय काळजे, सह-सचिव इम्रान खान यांनी पि.एम.पि.एल सोबत सतत पाठपुरावा करून आळंदी ते चाकण बस सेवा सुरु करून घेतली. श्री दत्तात्रय काळजे यांच्या हस्ते आळंदी ते चाकण, केळगाव हनुमानवाडी मार्गे बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. बस चालक व वाहक यांचा सत्कार कामगार नेते अरुण धुंडरे यांनी केला.
यावेळी आळंदी शहराचे मा. नगराध्यक्ष श्री बबनराव कुहाडे, भोसरी डेपोचे मॅनेजर विजयकुमार मदगे, रायकर बापु, इंद्रायणी हॉस्पिटलचे डॉ. संजय देशमुख, डॉ. नितिन गोसावी, पंढरीनाथ झरे तसेच आपचे संतोष इंगळे, कमलेश रणावरे, स्मिता पवार, सीता केंद्रे, ब्रम्हानंद जाधव, सचिन पवार, वाजिद शेख, वैजनाथ शिरसाट, प्रकाश हागवणे,अजय सिंग, भिमराव जोधळे,राजेंद्र काळजे, स्मिता काळजे, विलासशेठ धुंडरे उपस्थित होते.