पत्नीच्या नावे अमेरिकेत ऑनलाईन कंपन्या सुरु करून गैरव्यवहार करत कोट्यावधींची फसवणूक

पिंपरी l प्रतिनिधी
पत्नीचा छळ केला. तिला नशेचे इंजेक्शन देऊन तिच्याकडून पॉवर ऑफ अटर्नी करून घेतली. तिच्या नावे अमेरिकेत ऑनलाईन माध्यमातून कंपन्या सुरु केल्या. त्यात गैरव्यवहार केला. तसेच कोट्यावधी रुपयांचे कर्ज घेतले. संपत्तीसाठी पत्नीच्या बनावट सह्या करून घेतल्या. याप्रकरणी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश सतीश कानडे (रा. बावधन, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार सन 1997 ते 17 एप्रिल 2022 या कालावधीत बावधन पुणे व इत्ररत्र घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीकडे असलेले स्त्रीधन फिर्यादीने परत मागितले असता ते न देता उडवाउडवीची उत्तरे दिली. स्त्रीधनाचा आरोपीने परस्पर अपहार केला. सन 2015 मध्ये फिर्यादीस नशेचे इंजेक्शन देऊन फिर्यादीकडून पॉवर ऑफ अटर्नी करून घेऊन त्याचा वापर करून फिर्यादीचे सिमकार्ड, इमेल एक्सेस बँकेचे अकाउंट, इन्शुरन्स पोलिसी, एफ डी आरोपीने ताब्यात घेतले. त्याच्या माध्यमातून फिर्यादीचे वयक्तिक बचतीचे, पोलिसीचे पैसे परस्पर काढून अपहार करून फसवणूक केली. फिर्यादीच्या नावे अमेरिकेत ऑनलाईन माध्यमातून कंपन्या सुरु केला. त्यात गैरव्यवहार करून शासनाचा कर चुकवून शासनाची व फिर्यादीची फसवणूक केली. एलआयसी, होम फायनान्स या कंपनीकडून 17.50 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. फिर्यादी व आरोपी दोघांच्या नावावर असलेलें बंगला व त्याचे नावाचे ऑफिस गहाण ठेऊन त्यावर फिर्यादीच्या बनवत सह्या घेत कर्ज घेतले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.




