ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र

माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईचे आज विसर्जन…

पिंपरी : तीन दिवस माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौराईचे ज्येष्ठ नक्षत्रावर शुक्रवारी उत्साहात पूजन करण्यात आले. सकाळपासूनच पाऊसाच्या रिमझिम सरी सुरू होत्या. त्यामुळे पाऊसपाणी नीट होऊ दे आणि प्राणीमात्रांना सुखी राहू दे, हे मागणे या माध्यमातून गौराईने पूर्ण केल्याची भावना यावेळी होती. आज शनिवारी दुपारनंतर जेष्ठ गौरी विसर्जनाला सुरुवात होणार आहे.

या दिवशी एकमेकांकडे हळदीकुंकू समारंभाला बोलावले जाते. पाऊस असला तरी नटूनथटून घरोघरी हळदीकुंकवाचे कार्यक्रम पार पडले. सुहासिनी यामध्ये आनंदाने सहभागी झाल्या. अनुराधा नक्षत्रावर आवाहन करण्यात आलेल्या गौरींचे शुक्रवारी ज्येष्ठ नक्षत्रावर पारंपरिक पद्धतीने पूजन करण्यात आले.

अनेक प्रकारच्या पारंपरिक भाज्या, कोशिंबिरी, पुरणपोळीसह पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून घरोघरी महालक्ष्मींचे पूजन करण्यात आले. काठपदराच्या साड्या आणि अलंकारांनी सजलेल्या गौरी घरातील सगळ्यांचे आकर्षणाचे केंद्र ठरल्या. शुक्रवारी पहाटे उठून सुवासिनींनी महानैवेद्याची तयारी सुरू केली. निशिगंध, स्टर, शेवंती, मोगरा अशा वेगवेगळ्या फुलांचे हार आणि सजावटीचा सुगंध घरात दरवळला होता. दुपारी महानैवेद्य दाखवून कुटुंबीयांसमवेत भोजन करण्यात आले. त्यानंतर सुवासिनींची हळदी-कुंकू कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. किसलेल्या खोबऱ्यामध्ये पिठीसाखर मिसळून केलेली खिरापत आणि आटीव दूध देऊन घरी येणाऱ्या महालक्ष्मीरूपी सुवासिनींना हळदी-कुंकू देण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button