…नाहीतर कार्यक्रमाला येऊ नका; गौतमी पाटील संतापली

Gautami Patil | महाराष्ट्रातील लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळाचे प्रकार सातत्याने घडत असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. २१ नोव्हेंबर रोजी वर्धा येथे झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमातही प्रेक्षकांनी अचानक गोंधळ घालत खुर्च्यांची तोडफोड केली होती. या घटनेबद्दल गौतमी पाटीलने आता प्रतिक्रिया दिली आहे.
कार्यक्रमाच्या वेळी नेहमीच काहीतरी गोंधळ होतो याबद्दल गौतमीने खंत व्यक्त केली आहे. ती म्हणाली, माझी नेहमीची ही खंत आहे. मी एवढा छान कार्यक्रम करून बाहेर निघते आणि माझ्याबाबतीत असं काहीतरी ट्रोल केलं जातं. किंवा काहीतरी सांगितलं जातं. कार्यक्रमात मोजके काही लोकं असतात. एवढी गर्दी असते त्यातील काही लोकं आपण चांगले म्हणू, काही लोकं कसे असतात सांगता येत नाही. आम्ही कलाकार आहेत, आम्ही कार्यक्रम करतो, आज आमचं पोटपाणी त्यात आहे, तर मी विनंती करेल की ट्रोल करण… सगळा कार्यक्रम छान झाला, पण हे (गोंधळ) का झालं माहिती नाही. आमचा जनसेटचा पण प्रॉब्लेम झाला होता. पाच मनिटं तरी कार्यक्रम थांबला होता. बाकी सगळं छान झालं. मी छान बोलून आमचा कार्यक्रम होऊन मी तेथून निघाले.
हेही वाचा : न्यायमूर्ती सूर्य कांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश; सात देशांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या उपस्थितीत शपथविधी
तुम्ही कार्यक्रमाला येता, तुम्ही तुमचं एन्जॉय करायला येता, कला बघायला येत असतील तर तुम्ही कृपया थोडसं शांततेत कार्यक्रम बघा. तु्म्हाला जर गडबड गोंधळ करायचा असेल, तर असं करू नका, नाहीतर येऊ नका. कृपया सगळ्यांनी कार्यक्रमाला आलात तर व्यवस्थित कार्यक्रम पार पडू द्या, असे अवाहन गौतमीने तिच्या चाहत्यांना केले.




