Breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

“कोणताही राजीनामा मी पाहिला नाही, वाचला नाही”; जयंत पाटलांच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Supriya Sule :  शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत आहे. तर शशिकांत शिंदे यांच्या नावाची प्रदेशाध्यपदासाठी चर्चा होत आहे. एकीकडे जयंत पाटील यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनाम्याबाबत संभ्रम निर्माण झालेला असतानाच या चर्चाबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसल्याचे सुप्रिया सुळेंनी सांगितले आहे. पत्रकारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “जयंत पाटील यांचा राजीनामा मी पाहिलेला नाही, वाचलेला नाही. तुमच्या चॅनलला बातमी देणारा जो सूत्र आहे, त्या सूत्राने दिलेली बातमी विचार करुन लावा. हा सूत्र खात्रीलायक नाही. शिवाय तुमच्या विश्वाहर्तेचा प्रश्न आहे. उद्या पक्षाची बैठक आहे, त्यात कळेल. मी जयंत पाटलांशी रोज बोलते. जी घटना झाली नाही, त्या बद्दल काय बोलणार?” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा – ‘ही केस आपल्याला संपवायची आहे’; शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचे मोठे विधान

प्रदेशाध्यक्ष बदलणार का? या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. “राजकीय पक्ष, संघटनेत जी जबाबदारी पडेल, तिथे प्रत्येक कार्यकर्ता काम करायला तयार आहे. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे यांनी संघर्ष केला आहे. कितीही आव्हान आली तरी कालही, आजही आणि उद्याही संघर्ष करायला तयार असतात,”  असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अलिकडेच जयंत पाटील यांनी १० जून रोजी पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटील म्हणाले, “पवारसाहेबांनी मला खूप संधी दिली. शेवटी, पक्षाला नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी लागेल. मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की शेवटी पक्ष पवारसाहेबांचा आहे. त्यांनी यावर योग्य निर्णय घ्यावा. आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे,”असे जयंत पाटील म्हणाले होते.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button