breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र
पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर १२ वाहनांचा भीषण अपघात
सुदैवाने अपघातात कोणतीही जीविहितहानी नाही
![Horrific accident involving 12 vehicles on Pune-Mumbai Expressway](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/pune-mumbai-expressway-780x470.jpg)
पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिट जवळ १२ वाहनांमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सात ते आठ गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या असून गाड्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच अपघातामध्ये काहीजण जखमी झाले असल्याचे समजले आहे.
हा भयानक अपघात झाल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस देखील तातडीने घटना स्थळी पोहचवून मदत कार्य करत आहेत, तसेच स्थानिक नागरिक हे देखील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मोठ्या पद्धतीने सहकार्य करत आहेत.