TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपुणेमहाराष्ट्रराष्ट्रिय

जांभुळ येथील Xrbia Abode रहिवासी संकुलात होलिका दहन कार्यक्रम उत्साहात

वडगाव मावळ ः

संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येणाऱ्या हिंदू सणांपैकी होळी हा एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. होळी हा दोन दिवस साजरा करण्यात येणारा महत्त्वाचा सण असून. याला अनेक ठिकाणी रंगाचा सण सुद्धा म्हणतात. होळी या सणाला विविध नावाने ओळखले जात असून ग्रामीण भागामध्ये होळी हा सण शिमगा या नावाने प्रसिद्ध आहे. जांभुळ येथील एक्झर्बिया अॅबोड या रहिवासी संकुलात Xrbia मित्र मंडळाच्या वतीने आयोजित सोमवार दिनांक 6 मार्च रोजी रात्री 8 वाजता होलिका दहन कार्यक्रम उत्साहात पार पडला. होळीच्या गाण्यांनी संगीतमय झालेल्या या उत्साहात संकुलातील लहान-थोरांनी उपस्थिती दर्शविली. महिलांचीदेखील उपस्थिती लक्षणीय होती.

सदर कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये प्रामुख्याने Xrbia मित्र मंडळाचे अध्यक्ष धनंजय वाणी, मार्गदर्शन सतीश कदम, पंढरीनाथ हिंगे, दिपक पाटील, कृष्णा लोखंडे, दिनेश सकट, सुनिल पवार, नीलेश परदेशी, रवींद्र उत्तेकर, सार्थक कुंभार, संजय शिंदे, सुमित पुरी यांनी सहभाग नोंदविला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button