breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील ‘या’ भागात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस कोसळणार

पुणे | मान्सून संदर्भात महत्वाची अपडेट्स समोर आली आहे. राज्यातील शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच राज्यातील वातावरण दोन-तीन दिवसांपासून ढगाळ आहे. आज मान्सून तळकोकणात दाखल होत आहे. राज्यात मॉन्सून वाटचालीसाठी पोषकस्थिती निर्माण झाली आहे.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आज तळकोकणात आज पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पावसाचे आगमन होणार आहे. तर १० जूनपर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यांसह राज्यात पाऊस बरसणार आहे.

हेही वाचा    –      आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदी झाली प्रदूषित, नदी पात्र फेसाळलं 

अशातच राज्यातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. मुंबई आणि परिसरात उकाड्याचा त्रास आहे. तर राज्यातही घामांच्या धारांनी नागरिक वैतागले आहेत. त्यामुळे पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button