राज्यभरात दोन-तीन दिवस उकाडा वाढणार; घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं हवामान विभागाचं आवाहन

Heatwave Alert in Maharashtra | फेब्रुवारी महिन्यातच यंदा उन्हाळ्याची सुरुवात झाल्याचे चित्र असून, उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. रविवारी सोलापूर येथे उच्चांकी ३६ अंश तापमानाची नोंद झाली. सोमवारी कमाल आणि किमान तापमानातील चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
राज्यात थंडी ओसरली असून, कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार होत आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर, रत्नागिरी, जेऊर आणि अकोला येथे तापमान ३५ अंशांपार आहे. अनेक ठिकाणी तापमान ३२ ते ३५ अंशांच्या दरम्यान असल्याने उन्हाच्या झळा कायम आहेत. महाराष्ट्रातील कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पुढील चार दिवसांत कमाल तापमान दोन ते तीन अंशाने वाढण्याचा अंदाज आहे.
हेही वाचा : कुदळवाडीतील अतिक्रमण कारवाई..धर्माचे राजकारण… अन् प्रशासनाला न्यायालयाचा ‘बुस्टर’
ठिकाणे तापमान कमाल तापमान किमान
- पुणे—३४.२—१६.४
- अहिल्यानगर—३३.८—१५.७
- धुळे—३१.८—११.८
- जळगाव—३२.२—१६.५
- कोल्हापूर—३२.८—१९.८
- नाशिक—३३.७—१६.४
- सांगली—३४.२—१८.८
- सातारा—३४—१७.५
- सोलापूर—३६—२२.
- रत्नागिरी—३५.४—२०.५
- छत्रपती संभाजीनगर—३३.५—१८.६
- धाराशिव—३३—१७
- परभणी—३४.७—१८.१
- अकोला—३५—१९
- अमरावती—३२.४—१६.१
- भंडारा—३१.६—१६.१
- बुलढाणा—३४—२०
- चंद्रपूर—३२.८—निरंक
- गडचिरोली—३३.२—१५.६
- गोंदिया—३०.६—१६.४
- नागपूर—३२.४—१५
- वर्धा—३२—१६.४
- वाशीम—३४.६—२०.८
- यवतमाळ—३३.६—१८