breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

HDFC च्या ग्राहकांना मोठा धक्का, डिजिटल व्यवहार थांबवले

मुंबई -भारतीय रिझर्व्ह बँकेने खासगी क्षेत्रातील मोठी बँक एचडीएफसीला मोठा झटका दिला आहे. आरबीआयने एचडीएफसीच्या सर्व डिजिटल सेवांवर निर्बंध घातले आहेत. आरबीआयने 2 डिसेंबर रोजी आदेश जारी करुन इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग आणि पेमेंट यूटिलिटी सर्व्हिसवर बंदी घातली आहे. याशिवाय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी ग्राहकांना नवे क्रेडिट कार्ड जारी करण्यावरही बंदी घातली आहे. मागील दोन वर्षात एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांना डिजिटल सेवांमध्ये अनेक वेळा अडचणी आल्या. त्यामुळे आरबीआयने हे पाऊल उचललं आहे. मागील दोन वर्षात बँकेसाठी हा तिसरा मोठा झटका आहे.

बँकेकडून स्टॉक एक्स्चेंजला माहिती
आरबीआयने 2 डिसेंबर रोजी सर्व डिजिटल सेवा थांबवण्याचा आदेश दिला आहे, असं बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. आदेशात आरबीआयने सांगितलं आहे की बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, पेमेंट यूटिलिटीजमध्ये सातत्याने अडचणी येत आहे. मागील दोन वर्षांपासून हे सुरु आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत 21 नोव्हेंबर रोजी बँकेच्या इंटरनेट बँकिंग आणि पेमेंट सिस्टममध्ये समस्या आली होती. प्रायमरी डेटा सेंटरमध्ये पॉवर फेल झाल्यामुळे ही अडचण आली होती.”

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button