TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

घाटकोपरमध्ये भरदिवसा चोरट्यांनी दरोडा सराफा दुकानावर दरोडा

गोळीबार, धारदार शस्त्राने हल्ला

मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये भरदिवसा चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. अमृतनगर सर्कल येथील दर्शन ज्वेलर्सवर हा दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी दुकान मालकावर धारदार शस्त्राने हल्ला केला. तसेच दुकानाबाहेर दहशत माजवण्यासाठी गोळीबार देखील केला आहे. या घटनेने घाटकोपर परिसर हादरला आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दुकान मालकावर हल्ला
समोर आलेल्या माहितीनुसार तीन दरोडेखोर सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान दर्शन ज्वेलर्स मध्ये घुसले. त्यांनी दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. काही दागिने लुटले, मात्र दुकानचे मालक दर्शन मिटकरी यांनी विरोध केला. त्यामुळे दरोडेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि बाहेर पळाले. तिघांपैकी दोन जण दुचाकी वर पळून गेले तर एक जण हातात बंदूक घेऊन पळत निघाला.

हेही वाचा : “..तर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा”; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला टोला 

दहशत माजवण्यासाठी हवेत गोळीबार
तिसऱ्या दरोडेखोराने नागरिकांना भीती दाखविण्यासाठी आपल्या बंदुकीतून हवेत दोन गोळ्या झाडल्या आणि इंदिरा नगरच्या डोंगरावर पळून गेला. या घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम, गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. भरदिवसा अशा प्रकारचा दरोडा आणि गोळीबार होतो, त्यामुळे या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेमुळे परिसरात आता भीतीचं वातावरण पसरलं आहे.

आरोपींचा शोध घेण्यासाठी 6 पथकं तयार
या घटनेत दर्शन मिटकरी हे जखमी झाले आहेत, त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीसांनी या घटनेची गंभीर दखल घेत ताबडतोब गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी सहा विशेष तपास पथकं तयार केली आहेत. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचे काम करत आहेत. याबाबत बोलतान पोलीस अधिकारी म्हणाले की, ‘ही घटना अत्यंत गंभीर असून आरोपींना लवकरात लवकर अटक केली जाईल. आम्ही पुरावे गोळा करत आहोत. त्याच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जाईल.’

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button