गार्डन ग्रुप इंद्रायणीनगर तर्फे अनोख्या पद्धतीने मराठी राजभाषा दिन साजरा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/WhatsApp-Image-2022-02-28-at-6.23.20-PM.jpeg)
पिंपरी l प्रतिनिधी
गार्डन ग्रुप व योगा ग्रुप इंद्रायणीनगर यांच्या वतीने अखंड 108 सूर्यनमस्कार घालून मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला. रविवारी (दि. 27) सकाळी हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
नगरसेवक राजेंद्र लांडगे, युवा नेते शिवराज लांडगे, शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष निलेश मुटके, योग शिक्षक गुरुदास पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन दीप प्रज्वलन करण्यात आले.
योग गुरु दिलीप जाधव यांनी गायत्री मंत्र म्हणून सूर्य नमस्काराला सुरुवात केली. या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला. वय वर्ष तीन ते पंच्याहत्तर पर्यंतच्या नागरिकांनी सूर्यनमस्कार घालून मराठी राजभाषा दिवस साजरा केला.
कार्यक्रमासाठी समूह प्रमुख संजय राहाणे, सुभाष नेवसे, प्रशांत देशमुख, राजेश चौधरी, प्रशांत रासकर, सचिन तेलोरे यांनी परिश्रम घेतले. उद्योजक रामदास जैद यांनी आभार मानले. सूत्रसंचालन दिपक सोनवणे यांनी केले. मछिद्र मगर व संदीप वेदपाठक यांनी कार्यक्रमाला कॅमे-यात कैद केले. अल्पोपहार, चहापान देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.